जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / फिल्म रिव्ह्यु : 'जयजयकार' !

फिल्म रिव्ह्यु : 'जयजयकार' !

फिल्म रिव्ह्यु : 'जयजयकार' !

अमोल परचुरे, समीक्षक जयजयकार… याची कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय हे सिनेमाचं प्रमुख आकर्षण आणि वैशिष्टय म्हणायला लागेल. शंतनू रोडे याने सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. यापूर्वी त्याने ‘बाबू बँड बाजा’ या सिनेमाचं लेखन केलेलं होतं. त्यानंतर जयजयकार हा सिनेमा सादर करताना त्याने विषयाच्या वेगळेपणाबरोबरच उत्कृष्ट मांडणीही केलेली आहे. इंटरव्हलनंतर हा सिनेमा काहीसा नेहमीच्या वाटेनं जात असला, काही ठिकाणी स्लो वाटत असला तरी यातला मेसेज महत्त्वाचा असल्यामुळे या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येईल. तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर भारतीय भाषांमध्ये आत्तापर्यंत अनेक सिनेमे आलेले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अमोल परचुरे, समीक्षक

    जयजयकार… याची कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय हे सिनेमाचं प्रमुख आकर्षण आणि वैशिष्टय म्हणायला लागेल. शंतनू रोडे याने सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. यापूर्वी त्याने ‘बाबू बँड बाजा’ या सिनेमाचं लेखन केलेलं होतं. त्यानंतर जयजयकार हा सिनेमा सादर करताना त्याने विषयाच्या वेगळेपणाबरोबरच उत्कृष्ट मांडणीही केलेली आहे. इंटरव्हलनंतर हा सिनेमा काहीसा नेहमीच्या वाटेनं जात असला, काही ठिकाणी स्लो वाटत असला तरी यातला मेसेज महत्त्वाचा असल्यामुळे या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येईल. तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर भारतीय भाषांमध्ये आत्तापर्यंत अनेक सिनेमे आलेले आहेत. काहींनी भडक पद्धतीने तर काहींनी वरवर या समस्या मांडायचा प्रयत्न केलाय. पण शंतनु आणि टीमने तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे दाखवून दिलंय.

    जाहिरात

    काय आहे स्टोरी

    6346jay एका गावात एकटेच राहणारे रिटायर्ड मेजर अखंड…एकटे असले तरी आपल्याच मस्तीत जगत असतात. त्यांच्या वयाची जी इतर मंडळी आहेत ती या मेजरसाहेबांच्या खोडकरपणाला वैतागलेली आहेत. अशातच मेजर अखंड यांचा सामना होतो चार तृतीयपंथीयांशी..या तृतीयपंथीयांचं जगणं बघून मेजर काहीसे हादरतात, पण नंतर त्या चौघांना हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढायचं ठरवतात आणि त्यात यशस्वी होऊन दाखवतात. यामध्ये समाजातून त्यांना विरोध होतो, पण ते फिकीर करत नाही. तृतीयपंथीय म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी तिरस्काराचा विषय असतो, पण तीसुद्धा माणसंच आहेत हा विचार करुन त्यांना समजून घेणं, हे किती महत्त्वाचं आहे हे जयजयकारमधून दिसतं. इंटरव्हलनंतर कथेमध्ये बर्‍याच त्रुटी आहेत. समाजाकडून होणारा विरोध आणि मग त्यांचा मेजरना पाठिंबा हे अगदीच उरकल्यासारखं झालंय. त्यात सिनेमा हळूहळू उद्बोधक व्हायला लागतो. पण या गोष्टी सोडल्या तर अभिनयाच्या जोरावर सिनेमा तगून राहतो.

    परफॉर्मन्स

    4523jayjakar कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा अनेक भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी आजपर्यंत केलेल्या आहेत. जयजयकारमधील रिटायर्ड मेजर अखंड ही भूमिकाही तशीच आहे. निवृत्त आयुष्य मजेत जगणारा हा मेजर, तृतीयपंथीयांचं दु:ख बघून हळवा होतो, दिलदार होतो आणि हा दिलदारपणा प्रभावळकरांनी खूपच सुंदर सादर केलेला आहे. तृतीयपंथीयांची भूमिका करणारे चार कलाकारांचं खास कौतुक करावं लागेल आणि त्यातही संजय कुलकर्णीचं जरा जास्तच..कुठेही ही भूमिका भडक होणार नाही, उग्र होणार नाही अशा प्रकारे अतिशय संतुलित अभिनय संजय कुलकर्णी यांनी केलेला आहे. सडक सारख्या सिनेमात भडक मौसी आपण पाहिली आहे, पण त्याच्या अगदी उलट अतिशय रिअलिस्टीक मौसी संजय कुलकर्णी यांनी साकारली आहे आणि इतर तीन कलाकारांनी त्यांना तशीच साथ दिली आहे.

    जाहिरात

    रेटिंग 100 पैकी 60

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात