25 जुलै : सीमा भागातील अस्मितेच्रे प्रतिक समजल्या जाणार्या आणि गेल्या 56 वर्षांपासून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलान फडकणार्या महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा चौथरा सरकारने पोलिसी दडपशाही आणि बळाचा वापर करून काढून टाकला आहे. यामुळे बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 56 वर्षांपासून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य येल्लूर हा चौथरा डौलान फडकत होता मात्र पोटशूळ उठल्याने कानडी सरकारने सीमा भागातील मराठीचे अस्तित्वच संपण्याचा विडा उचलला आहे. गोकाकमधील भिमाप्पा गडाद नावाच्या एकाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाला सोमवार 28 ऑगष्ट रोजी चौथरा हटवून न्यायालयासमोर म्हणणे मांडायचे होते. त्यानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने हा मराठी अस्मितेचा फलक काढला आहे . शुक्रवारी सकाळी अचानक जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा फलक हटवला. महापालिकेवरील भगवा ध्वज असो किंवा बेळगाव शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकातील संयुक्त महाराष्ट्र चौक नावाचा फलक असो हे मराठी फलक काढून मराठीचा संस्कृती नष्ट करण्याचा घात घातला आहे. ॉ महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने येळ्ळूर मध्ये बैठक घेण्यात येणार आहे. हा फलक परत लावण्यात यावा यासाठी निर्णय घेण्यात येणार आहे. बेळगाव सहा सीमा भागातील मराठी वर वक्रदृष्टी पडलेल्या कर्नाटक सरकारला रोखण्यासाठी महाराष्ट्रातील नेते पुढे येतील का असा सवाल सीमा भागातील जनता करत आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++