मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'पुढच्या वर्षी लवकर या'ची हाक बाप्पानं ऐकली!

'पुढच्या वर्षी लवकर या'ची हाक बाप्पानं ऐकली!

gg3-2012

15 सप्टेंबर :  गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे. मात्र निरोप देताना भक्तांच्या 'लवकर या'या हाकेला ओ देत, बाप्पा पुढील वर्षी गणपतीचं आगमन यंदापेक्षा 11 दिवस लवकर होणार आहे.

2017 मध्ये शुक्रवारी 25 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे, तर 5 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी असेल. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.

पुढच्या वर्षी जेष्ठा गौरींचे आगमन पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवार 29 ऑगस्ट रोजी होणार असून गौरी गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी म्हणजे गुरुवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी असल्याने बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Bappa morya re, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई