जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पानसरे हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

पानसरे हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

पानसरे हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली  दखल

19 जानेवारी : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही दखल घेतली असून याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. गोविंदराव पानसरेंवर हल्ला होऊन तीन दिवस उलटलेत. पण तरीही अजून त्यांच्यावर हल्ला करणार्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. सोमवारी पानसरे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला तीन दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही मोकाटच आहेत. हल्ला करणार्‍या व्यक्तींनी चेहरा झाकला नव्हता. तसंच त्यांनी पानसरे यांच्याकडे कोणताही विचारणा न करता त्यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :
    pansare 12

    19 जानेवारी :  ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही दखल घेतली असून याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

    गोविंदराव पानसरेंवर हल्ला होऊन तीन दिवस उलटलेत. पण तरीही अजून त्यांच्यावर हल्ला करणार्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. सोमवारी पानसरे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला तीन दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही मोकाटच आहेत. हल्ला करणार्‍या व्यक्तींनी चेहरा झाकला नव्हता. तसंच त्यांनी पानसरे यांच्याकडे कोणताही विचारणा न करता त्यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. या हल्ल्याच्या तपासाबाबत महत्त्वाचा ठरणारा उमा पानसरे यांचा जबाब घेणं अद्याप बाकी आहे. त्यांच्या जबाबानंतर हल्लेखोरांबाबत काही तपशील मिळतील असे कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी सांगितले.

    जाहिरात

    दरम्यान, गोविंद पानसरे यांची प्रकृती नाजूक पण स्थिर आहे. पानसरे हे शुध्दीवर आहेत पण कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू आहे.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात