जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पानसरे यांना उपचारांसाठी मुंबईला हलवणार

पानसरे यांना उपचारांसाठी मुंबईला हलवणार

पानसरे यांना उपचारांसाठी मुंबईला हलवणार

20 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांना एअर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पानसरे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या ‘ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. पानसरे कुटुंबियांनी, डॉक्टरांनी परवानगी दिली तर मुंबईला हलवण्याला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी सकाळी कोल्हापुरातील त्यांच्या घराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये गोविंद पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :
    pansare 12

    20 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांना एअर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पानसरे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या ‘ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. पानसरे कुटुंबियांनी, डॉक्टरांनी परवानगी दिली तर मुंबईला हलवण्याला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

    गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी सकाळी कोल्हापुरातील त्यांच्या घराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये गोविंद पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. कोल्हापूरमधल्या ‘ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांनंतर गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गुरुवारी त्यांच्या फुफ्फुसाला सूज आल्याचे समजल्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

    जाहिरात

    दरम्यान, कॉ. गोविंद आणि उमा पानसरे यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींचे अद्याप धागेदोरे लागले नसले, तरी पोलिसांनी हल्लेखोरांची रेखाचित्रं तयार केली आहेत. उमा पानसरेंना ही रेखाचित्र दाखवल्यावर त्यांनी ओळखल्यास ही रेखाचित्र प्रसिद्ध केली जाणार आहेत. तर पोलिसांनी ज्या 3 मोटारसायकल्स जप्त केल्या आहेत, त्या बेवारस स्थितीत असल्यानं त्यांच्या मुळ मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. पानसरेंवरच्या हल्ल्याला 5 दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडले नाहीत. हल्लेखोरांना एका 12 वर्षांच्या मुलानं पाहिलं असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. पण उमा पानसरेंचा जबाब अजून नोंदवला नाहीये, आज त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात