जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार

06 जानेवारी : पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक भारतीय चौक्या आणि गावांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक आज जम्मूतील गोळीबाराने प्रभावित झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. पाकिस्तानी रेंजर्सकडून सोमवारी झालेल्या गोळीबारात एक बीएसएफचा जवान जखमी झाला होता. जम्मूतील सांबा आणि हिरानगर सेक्टरमधील जवळपास 45 भारतीय चौक्यांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे सांबा, हिरानगर आणि आर्निया सेक्टरमधल्या गावांतील नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    0823_World_IndiaPakistan_standard_600x400 06 जानेवारी : पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक भारतीय चौक्या आणि गावांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक आज जम्मूतील गोळीबाराने प्रभावित झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. पाकिस्तानी रेंजर्सकडून सोमवारी झालेल्या गोळीबारात एक बीएसएफचा जवान जखमी झाला होता. जम्मूतील सांबा आणि हिरानगर सेक्टरमधील जवळपास 45 भारतीय चौक्यांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे सांबा, हिरानगर आणि आर्निया सेक्टरमधल्या गावांतील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तर आतापर्यंत तब्बल 7000 नागरिकांना गावांमधून हलवण्यात आलं आहे. या भागातील अनेक शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक परीक्षा रखडल्या आहेत. कथुआ जिल्हा प्रशासनाने सीमेजवळील सर्व गावांतील शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. सीमेनजीक 65 गावांना याचा मोठा फटका बसला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात