14 फेब्रुवारी : वर्ल्ड कप ‘वॉर’ला आज सुरुवात झाली आणि आजच्या पहिल्या मॅचचा विजयी श्रीगणेशा न्युझीलंडच्या टीमने केला. आजच्या पहिल्याच मॅचमध्ये यजमान न्यूझीलंडनं विजयी सलामी दिलीये. न्यूझीलंडनं श्रीलंकेचा 98 रन्सनी दणदणीत पराभव केलाय.
टॉस जिंकून श्रीलंकेनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण लंकेचा हा निर्णय चांगलाच फसला. पहिल्याच मॅचमध्ये किवीजनं रन्सचा डोंगर उभारला. न्यूझीलंडनं लंकेसमोर विजयासाठी 332 रन्सचं टार्गेट ठेवलं. न्यूझीलंडच्या जवळपास रगळ्याच बॅट्समननं धुवाँधार बॅटिंग केली. ग्युप्टील 49, मॅकलम 65, विल्यमसन 57, तर कोरी अँडरसननं 75 रन्स ठोकत टीमला 300 रन्सचा टप्पा पार करुन दिला. लंकेतर्फे जीवन मेंडिस आणि लकमलनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर लंकेची सुरुवातही चांगली झाली. पण थिरीमाने 65 रन्सवर आऊट झाल्यावर ठराविक अंतरानं लंकेच्या विकेट पडत गेल्या. दिलशान 24 तर संगकारा 39 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. तर महेला जयवर्धनने भोपळाही फोडू शकला नाही. कॅप्टन मॅथ्यूजनं 46 रन्सची झुंज देत मॅच वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण साऊदी, बोल्ट, मिल्न, व्हिटोरी आणि कोरी अँडरसन या पाचही बॉलर्सनं प्रत्येकी 2 विकेट घेतल लंकेला धूळ चारली. लंकनं टीम 233 रन्सवर ऑलआऊट झाली. वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची न्युझीलंडच्या टीमने नोंद केली. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







