28 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे नेते नरेंद्र मोदी आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शारदा चिट फंड घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी काल प. बंगालमधल्या श्रीरामपूर इथल्या सभेत बोलताना केला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे नेते संतापलेत. मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मोदी हे गुजरातचे ‘खाटीक’ असल्याचे म्हटले आहे.
मोदींनी रविवारी झालेल्या सभेत ममतांचा शारदा चीट फंड गैरव्यवहार सहभाग असल्याचे आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना तृणमुलचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन म्हणाले, ‘गुजरातचे खाटीक बंगालमध्ये हवेतून अवतरले. त्यांच्याकडे बंगालच्या विकासाच्या मॉडेलचं उत्तर नाही. त्यामुळे ते वैयक्तिक हल्ले करताहेत. गुजरातचे खाटीक स्वतःच्या पत्नीची काळजी घेऊ शकले नाहीत. ते एवढ्या महान देशाची कशी काय काळजी घेऊ शकतील?’
गेल्या दोन महिन्यांपासून ममतांवर टीका करण्याचे टाळणाऱ्या नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. ममतांचा शारदा चीट फंड गैरव्यवहारात सहभाग असेल अशी आम्हाला आशा नव्हती, असे मोदींनी म्हटले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++