23 सप्टेंबर : ठाण्यात मुंब्रा इथं शनिवारी इमारत कोसळल्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. धोकादायक इमारतीच्या पुनर्वसनसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन सुरू करणार आहे. 4 ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याबरोबरच ठाणे ते मंत्रालय असा लाँगमार्च काढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली.
बेकायदा इमारतींच्या प्रश्नांवरून ठाणेकरांचा जीव धोक्यात आल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे मुंब्रा इथं या अगोदर दोन इमारती कोसळल्या होत्या. यात लकी कंपाऊंडमध्ये अनधिकृत इमारतीत कोसळलेली होती यात 78 जणांना आपला जीव गमावावा लागला होता. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना स्थानिक राजकीय नेत्यांचाच पाठिंबा असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता.
या प्रकरणानंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं धडक कारवाई सुरू केली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचं पक्ष कार्यालयाच अनधिकृत असल्याचं समोर आलं होतं. आपल्याच मतदारसंघात विरोधात भूमिका घेतली तर आपलीच नाचक्की होईल या भीती पोटी त्यावेळी स्थानिक सर्वपक्षीय आमदारांनी एक दिवस ठाणे बंद करून जनतेस वेठीस धरलं होतं. तसंच मोर्चा काढण्याचंही ठरलं होतं पण जनतेच्या विरोधामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा याच प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाची घोषणा केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.