23 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन तीन उलटले पण अजूनही हत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. हत्या कोणी केली हेही स्पष्ट झालेलं नाही आणि हल्ल्याचे सूत्रधारही हाती लागले नाहीत. प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितलेल्या वाहन क्रमांकावरुन जवळपास 49 मोटार सायकलस्वारांची पोलिसांनी चौकशी केली पण त्यातूनही ठोस माहिती मिळाली नाही.
पोलिसांनी 8 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय. त्यात आरोपी दिसत असले तरीही ते फुटेज अजून तपासाला दिशा देऊ शकलेलं नाही.
दरम्यान, दाभोलकर यांच्या खुनाचा तपास पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलिसांनी ही सुरू केला आहे. दाभोलकर यांचा मंगळवारी खून झाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचचं एक पथक तात्काळ पुणे येथे तपासासाठी निघालंय.
एवढंच नव्हे तर मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईतही तपास सुरू केलाय. हा खून सुपारी देऊन झाल्याचा संशय व्यक्त होतोय. ही सुपारी मुंबईतल्या एखाद्या गँगला देण्यात आली होती का या दृष्टीने तपास सुरू आहे. ज्या पद्धतीने खून झालाय ती पद्धत पाहता ही हत्या गँगच्या सराईत शूटरांनी केल्याचा संशय आहे.
आयबीएन लोकमतचे सवाल
1) पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ काय करत आहेत ?
2) घटनेला 60 तास होऊनही आरोपी मोकाट कसे?
3) पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असताना हल्ला होणं हे पोलिसांचं अपयश नाही का ?
4) विखारी लिखाण करणार्या प्रकाशनांवर बंदीला उशीर का होतोय ?
5) आरोपींच्या रेखा चित्रावरून घोळ घालणार्या पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का ?
6) कटाची पूर्व माहिती मिळवण्यात गुप्तचर संस्था अपयश ?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.