22 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाला त्यादिवशी कोल्हापूरमधील एका रस्त्यावरच्या डिव्हायडरला आदळलेल्या संशयास्पद बाईकचे एक्सक्लुझिव्ह फोटो IBN लोकमतच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे ही संशयास्पद बाईक नवी कोरी असून तिच्यावर नंबर प्लेटही नव्हती. कोल्हापूरमधील सायबर चौकाकडून संभाजी नगरकडे जाणार्या रिंग रोडवरील डिव्हायडरला बाईकने धडक दिली होती. ही बाईक तिथे बराच वेळ पडून होती अशी माहिती समोर आली आहे. या बाईकची माहिती कोल्हापूरमधील अपंग सैनिक राजेंद्र पाटील यांनी फोटोसह पोलिसांना दिली आहे. पाटील हे कारगिल युद्धात जखमी झालेले जवान असून कॉम्रेड पानसरे आणि उमा पानसरे यांच्यासहित सैनिकांच्या प्रश्नांवर कोल्हापूरमध्ये त्यांनी उपोषणही केले आहे. दरम्यान, गोविंद पानसरेंच्या मारेकर्यांचा तपास घेण्यासाठी पोलीस यंत्रणाही कसोशीने प्रयत्न करत आहेत. पण तरीही मारेकर्यांची त्यांना अजून काहीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पानसरे दाम्पत्यावरील हल्लेखोरांबाबत माहिती देणार्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा कोल्हापूर पोलिसांनी केली आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







