19 फेब्रुवारी : डॉ.नरेंद दाभोलकरांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत दाभोलकर कुटुंबीयांनी पद्मश्री पुरस्काराचा स्विकार करू नये असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केलं आहे. पुण्यामध्ये आज (मंगळवारी) 'प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे' या सीडीचं प्रकाशन अभिनेत अमोल पालेकर आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या हस्ते झालं. डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण होत आहे. मात्र अजूनही मारेकर्यांचा शोध लागलेला नाहीये. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी दाभोलकर कुटुंबीय तसंच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Padma award, Padmishri