मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /तुकाराम मुंढेंची पुणे परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

तुकाराम मुंढेंची पुणे परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    tukaram_mundhe

    25 मार्च : नवी मुंबईचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची शनिवारी पुणे परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी (पीएमपी) नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले. तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या जागी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

    नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत सरकारच्या धोरणाशी घेतलेला आक्रमक पवित्र्याला नगरसेवकांकडून जोरदार विरोध होत होता. अवैध बांधकामाना संरक्षण देण्यास नाकारणाऱ्या  मुंढे यांच्या भूमिकेला हायकोर्टाने गौरवल्याच्या घटनेला 24 तास उलटायच्या आत सरकाने शुक्रवारी त्यांची महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती.

    दरम्यान, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून पीएमपीच्या प्रमुखपदी तुकाराम मुंढे यांची नेमणूक करावी अशी मागणी पुण्याचे भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पीएमपीप्रवासी मंचनेही याच आशयाची मागणी केली होती. आश्चर्य म्हणजे मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल शिरोळे यांनी फडणवीस यांचे आभार मानत पीएमपीचा कारभार सक्षम होईल अशी आशा व्यक्त केली आहे.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


    First published:
    top videos

      Tags: PMPML