जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

25 जानेवारी : देशातील प्रतिष्ठेचे आणि सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं 127 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची दखल घेत सरकारनं त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. गेली चौदा वर्ष नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी राज्यभर मोठं काम केलं. जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. पुण्यात दिवसाढवळ्या दाभोलकरांवर गोळ्या झाडून खून करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    narendra dabholkar 25 जानेवारी : देशातील प्रतिष्ठेचे आणि सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं 127 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची दखल घेत सरकारनं त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.

    गेली चौदा वर्ष नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी राज्यभर मोठं काम केलं. जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. पुण्यात दिवसाढवळ्या दाभोलकरांवर गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी लगेचच हिवाळी अधिवेशनात जादुटोणाविरोधी कायदा मंजूर करुन घेतला.

    जाहिरात

    पण त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आपले प्राण गमवावे लागले. आणि केंद्र सरकारनंही पद्मश्री पुरस्कार देऊन मरणोत्तरच त्यांच्या कार्याची दखल घेतली. मात्र यावरुन अंनिसची कार्यकर्ती आणि दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी दुःख व्यक्त केलंय.

    ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकरांना पद्मविभूषण

    रसायनशास्त्रात केलेल्या अतुलनिय कामगिरी करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. माशेलकर यांनी रसायनशास्त्र विषयात केलेल्या बहुमोल कामगिरीची दखल सरकारने घेतलीय. सरकारनं अजून पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केलेली नाही. पण, डॉ. माशेलकर यांनीच पद्मविभूषण पुरस्काराबद्दलची माहिती दिलेली आहे.

    तसंच माशेलकर यांनी हळद आणि इतर भारतीय पेटंट्ससाठी लढून तो लढा यशस्वी करुन दाखवला होता. त्यामुळे जगात भारतीय वस्तूंची मक्तेदारी कायम राहिली. या लढाईत डॉ. माशेलकर यांची महत्त्वाची भूमिका होती. डॉ. माशेलकर यांनी मुंबईत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. आणि विज्ञान क्षेत्रात भारताला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं. डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे योगदान

    • - रसायनसास्त्रातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ
    • - मुंबईमध्ये प्रतिकूल परिस्थिती पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं
    • - भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञानविषयक धोरणांना दिशा देण्यात मोलाचं योगदान
    • - हळद, कडुलिंब, बासमती तांदूळ यांचे पेटंट्स भारताला मिळवून दिली
    • - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला (NCL) आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं
    • - सेंटर फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR)चे महासंचालक होते
    • - पॉलिमर विज्ञान या क्षेत्रात मोठं संशोधन केलं
    • - पद्मश्री, पद्मभूषण आणि 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार

    पद्मविभूषण पुरस्कारचे मानकरी

    • - डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण
    • - बीकेएस अय्यंगार, योगगुरु, पद्मविभूषण

     पद्मभूषण पुरस्कारचे मानकरी

    • - जस्टीस जे. एस. वर्मा (मरणोत्तर), पद्मभूषण
    • - परवीन सुलताना, शास्त्रीय संगीत गायिका, पद्मभूषण
    • - व्ही. एन. कौल, माजी कॅग, पद्मभूषण
    • - लिएंडर पेस, टेनिसपटू, पद्मभूषण
    • - अनिता देसाई, लेखिका, पद्मभूषण
    • - पुलेला गोपीचंद, बॅडमिंटन कोच, पद्मभूषण

     पद्मश्री पुरस्कारचे मानकरी

    • - नरेंद्र दाभोलकर, संस्थापक-अध्यक्ष, अंनिस (मरणोत्तर), पद्मश्री
    • - युवराज सिंग, क्रिकेटर, पद्मश्री,
    • - दिपिका पल्लीकल, स्क्वॅश प्लेअर, पद्मश्री
    • - परेश रावल, अभिनेता, पद्मश्री
    • - विद्या बालन, अभिनेत्री, पद्मश्री
    • - पं. विजय घाटे, तबलावादक, पद्मश्री
    • - संतोष सिवन, सिनेमॅटोग्राफर, पद्मश्री
    • - सुदर्शन पटनायक, वाळूशिल्पकार, पद्मश्री
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: padmishri
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात