Home /News /news /

ठाणे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, सेनेनं पाळाला युतीधर्म

ठाणे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे, सेनेनं पाळाला युतीधर्म

Thane-Municipal-Corporationठाणे - 4 एप्रिल : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यंदा भाजपाला मिळालेल्या आहेत. शिवसेनेने युतीधर्मानुसार सत्तास्थापनेवेळी दिलेला शब्द पाळला आहे. त्यानुसार स्थायी समिती सभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे संजय वाघुले यांचा विजय निश्चित झालाय. आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने तटस्थाची भूमिका घेतल्यामुळे वाघुले यांना 9 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी यांना केवळ 5 मते मिळाली. 16 स्थायी सदस्यांच्या बलाबलामध्ये शिवसेनेचे आठ आणि भाजपचा एक असे निर्विवाद बहुमत होते. या निवडणुकीत काँग्रेसचे यासीन कुरेशी आणि मनोज शिंदे अनुपस्थित राहिले. पालिका निवडणुकीमुळे आघाडीतच बिघाडी निर्माण आहे. मात्र, मनसेच्या एकमेव सदस्य असणार्‍या राजश्री नाईक यांनी केवळ राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी यांना मतदान केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Thane municipal corporation, भाजप, शिवसेना

पुढील बातम्या