जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / टोलप्रकरणी राज ठाकरेंवर कारवाई होणार?

टोलप्रकरणी राज ठाकरेंवर कारवाई होणार?

टोलप्रकरणी राज ठाकरेंवर कारवाई होणार?

30 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौर्‍यावर आहेत. टोलबाबत चिथावणीखोर भाषण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आजपासून सुरु होणारा राज ठाकरेंचा 4 दिवसांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे. राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता पुण्यात दाखल होतील त्यामुळे याप्रकरणी पोलीस काय कारवाई करताहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंच्या अटकेवरून सत्ताधारी काँग्रेेस-राष्ट्रवादीतच मतभेद निर्माण झाले आहेत. दौर्‍याच्या कार्यक्रमानूसार उद्या सकाळी मनसेच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा बीएमसीसी कॉलेजमध्ये होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Image mumob_2108_raj_thackrey_vis_300x255.jpg 30 जानेवारी :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौर्‍यावर आहेत. टोलबाबत चिथावणीखोर भाषण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आजपासून सुरु होणारा राज ठाकरेंचा 4 दिवसांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे.

    राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता पुण्यात दाखल होतील त्यामुळे याप्रकरणी पोलीस काय कारवाई करताहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंच्या अटकेवरून सत्ताधारी काँग्रेेस-राष्ट्रवादीतच मतभेद निर्माण झाले आहेत. दौर्‍याच्या कार्यक्रमानूसार उद्या सकाळी मनसेच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा बीएमसीसी कॉलेजमध्ये होणार आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. 1 फेब्रुवारीला राज ठाकरे पुण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेणार असल्याचं समजतेय. तर 2 फेब्रुवारीचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात