मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा 'तो' व्हिडिओ खरा

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा 'तो' व्हिडिओ खरा

  kanhaiya-leader-student-jawaharlal-gestures-university-addresses_2ae9ab04-e1b4-11e5-a1fb-86e627e3731c

  12 जून :  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी देणार्‍या व्हिडिओ फुटेज खरे असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हिडिओची सत्यता पटल्यामुळे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कन्हैयासह अन्य दोघांवर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आलं आहेत.

  यासंदर्भात सीबीआयने दिल्ली पोलिसांना 8 जून रोजी अहवाल सादर केला. देशविरोधी घोषणांचा व्हिडीओ हा खरा असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही, असा दावा सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅब केला आहे.

  याआधी मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी जेएनयूत झालेल्या कार्यक्रमासंदर्भातील चार व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी गांधीनगर इथल्या फॉरेन्सिक लॅब पाठवलं होतं. हे चारही व्हिडिओ खरे असल्याचा अहवाल सीएफएसएलने दिला होता. इतकच नव्हे तर 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमासंबधीचे सात व्हिडिओ हैदराबाद इथल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यापैकी दोन व्हिडिओत बदल करण्यात आले होते. तर अन्य पाच व्हिडिओ खरं असल्याचं म्हटलं होतं.


  बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

  Follow @ibnlokmattv


  First published:
  top videos

   Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh