मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'जेएनयू'मधल्या देशविरोधी घोषणांना हाफिज सईदचा पाठिंबा- राजनाथ सिंह

'जेएनयू'मधल्या देशविरोधी घोषणांना हाफिज सईदचा पाठिंबा- राजनाथ सिंह

rajnath_3_1_0_0

नवी दिल्ली – 14 फेब्रुवारी : जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयु) विद्यापीठामध्ये संसद हल्ल्यातला अतिरेकी अफझल गुरूच्या आठवणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पाकिस्तानमधल्या लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीझ सईदचा पाठिंबा होता, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं.

राजनाथ सिंह म्हणाले की, देशविरोधी घोषणाबाजी करून देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱयांना आमचे सरकार माफ करणार नाही. जेएनयूमध्ये जे काही घडले त्याला हाफिज सईदचे समर्थन होते. हा प्रकार अत्यंत दुदैवी आहे. पण देशाने हे सत्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारतविरोधी घोषणा दिल्या जात असताना सर्व देशाने त्याविरोधात एकत्र येणं आवश्यक आहे. तसेच, राष्ट्रविरोधी घोषणा करणा-यांना सरकार सोडणार नाही, असेही ते म्हणाले. मंगळवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी दहशतवादी अफजल गुरुच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. 2013 साली अफजल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, राजनाथ सिंह, हाफिज सईद

पुढील बातम्या