जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जयललिता यांच्यानंतर कोण ?

जयललिता यांच्यानंतर कोण ?

जयललिता यांच्यानंतर कोण ?

06 डिसेंबर : जयललितांनंतर कोण? ह्या राजकीय प्रश्नाचं उत्तर आता शोधायला सुरुवात झालीय आणि जे वेगानं नाव समोर येतंय ते आहे शशीकला. शशीकला ह्या जयललितांच्या शेवटपर्यंत सावलीसारख्या सोबत राहील्या. असं सांगतात की शशीकला जेवढ्या जयललितांच्या जवळ जाऊ शकल्या तेवढं दुसरं कुणीच जाऊ शकलं नाही. त्यामुळे जयललितांच्या निधनानंतर शशीकला ह्याच एडीआयएमकेची सुत्रं सांभाळतील अशी शक्यता आहे. पण शशीकलांना पक्षात फार मान्यता नसल्याचंही सांगितलं जातंय. कारण जयललिता असताना शशीकला ह्या सरकारमध्ये अधिका•यांच्या बदल्यांपासून ते नियुक्तीपर्यंत सगळं बघायच्या आणि नेत्यांना मात्र किंमत द्यायच्या नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    sasikala 06 डिसेंबर : जयललितांनंतर कोण? ह्या राजकीय प्रश्नाचं उत्तर आता शोधायला सुरुवात झालीय आणि जे वेगानं नाव समोर येतंय ते आहे शशीकला.

    शशीकला ह्या जयललितांच्या शेवटपर्यंत सावलीसारख्या सोबत राहील्या. असं सांगतात की शशीकला जेवढ्या जयललितांच्या जवळ जाऊ शकल्या तेवढं दुसरं कुणीच जाऊ शकलं नाही. त्यामुळे जयललितांच्या निधनानंतर शशीकला ह्याच एडीआयएमकेची सुत्रं सांभाळतील अशी शक्यता आहे.

    पण शशीकलांना पक्षात फार मान्यता नसल्याचंही सांगितलं जातंय. कारण जयललिता असताना शशीकला ह्या सरकारमध्ये अधिका•यांच्या बदल्यांपासून ते नियुक्तीपर्यंत सगळं बघायच्या आणि नेत्यांना मात्र किंमत द्यायच्या नाहीत. एवढंच नाही तर जयललितांसारखे करीश्माई नेतृत्वगुणही शशीकलांकडे नसल्याचं सांगितलं जातंय. पण ह्या स्थितीत मग मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे सरकार आणि मग पडद्यामागून पक्षातले निर्णय शशीकला घेतील अशीही शक्यता वर्तवली जातेय.

    जाहिरात

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: sasikala
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात