13 जून : गावातल्या पेय जल योजनेतला भ्रष्टाचार उघडकीला आणला म्हणून सातार्यातल्या सैदापूर गावात 2 आरटीआय कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते प्रवीण पवार आणि शिवाजी पवार यांनी गावातील पेय जल योजनेतील घोटाळा उघड केला म्हणून त्यांच्यावर काठ्या आणि तलवारीने हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे. तर इतर फरारी आरोपींचा पोलिसांच्या दोन तुकड्या शोध घेत आहेत. सैदापूर गावातील 48 लाखांच्या पेय जल योजनेतील घोटाळा बाहेर काढला म्हणून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झालेत. त्यांना सातार्यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
गावातील अनेक योजनांमध्ये गावातील राजकीय लोकांनी भ्रष्टाचार केला. हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी प्रवीण पवार यांनी माहितीचा अधिकाराखाली माहिती घेऊन या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण या लोकांनी प्रवीण पवार आणि त्याचा साथीदारावरच गुरुवारी अचानक हल्ला चढवला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++