जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / राजपाल यादवला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राजपाल यादवला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राजपाल यादवला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी

03 डिसेंबर : कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये असं म्हणतात पण कोर्टाची पायरी न चढल्यामुळे विनोदी अभिनेता राजपाल यादव जेलमध्ये पोहचला. दिल्लीतल्या एका उद्योगपतीला 5 कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बेभान वागल्याप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजपाल यादवसह त्याच्या पत्नीलाही शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याच्या पत्नीला दिवसभर रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. या प्रकरणी आज मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने राजपाल यादवच्या दोन्ही वकीलांनाही नोटीस बजावली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    rajpal yadav 03 डिसेंबर : कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये असं म्हणतात पण कोर्टाची पायरी न चढल्यामुळे विनोदी अभिनेता राजपाल यादव जेलमध्ये पोहचला. दिल्लीतल्या एका उद्योगपतीला 5 कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बेभान वागल्याप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

    राजपाल यादवसह त्याच्या पत्नीलाही शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याच्या पत्नीला दिवसभर रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. या प्रकरणी आज मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने राजपाल यादवच्या दोन्ही वकीलांनाही नोटीस बजावली आहे.

    जाहिरात

    हे प्रकरण 2010 मधील आहे. राजपाल यादव याने मुरली प्रोडक्शनकडून 5 कोटी रुपये कर्जावर घेतले होते. व्याजासह पैसे परत करेल असं शपथपत्रही त्याने लिहून दिलं होतं. मात्र पैसे देताना राजपालने टाळाटाळ केली. अखेर या प्रकरणाचा वाद कोर्टात पोहचला. आज कोर्टात सुनावणीच्या वेळी राजपाल आणि त्यांची पत्नी राधा राजपाल यादव आपल्या मुलासह कोर्टात हजर होते.

    न्यायाधीशांसमोर हजर केल्यानंतर राजपाल यांना आपली पत्नी कुठे आहे असं न्यायाधीशांनी विचारले असता. ती माझ्या मुलासह बाहेर उभी असून त्याची देखभाल करत आहे. न्यायाधीशांनी पोलिसांना मुलाला सांभळण्याचे आदेश देऊन राधा यादव यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर लंच टाइम नंतर राजपाल आणि त्याची पत्नी दोघेही गायब झाले. पोलिसांनी,वकिलांनी वारंवार विचारणा करुनही राजपाल काही न्यायाधीशांसमोर हजर झाले नाही. राजपाल यांनी शपथपत्र देऊन सुद्धा न्यायाधीशांसमोर हजर होत नसल्यामुळे हा कोर्टाचा अवमान आहे असं ठणकावून सांगत कोर्टाने दोघांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं. तरी सुद्धा राजपाल कोर्टात हजर झाले नाही. अखेर न्यायाधीशांनी राजपालच्या अशा वागण्यावर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राजपालवर फसवणुकीच्या आरोपाचा निकाल अजून बाकी आहे. पण आपल्या बेभान वागण्यामुळे राजपालला जेलची हवा खावी लागली आहे.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात