13 जानेवारी : उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मनाविरूद्ध त्यांना 'झेड' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात 30 सुरक्षा रक्षक आणि एका एस्कॉर्ट वाहनाचा समावेश असणार आहे. केजरीवाल यांचा झेड सुरक्षा घ्यायला आधीपासून आक्षेप आहे. पण भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमुळे केजरीवाल यांच्या जीवाला पाणी आणि टेंडर माफियांकडून धोका असल्याचे गुप्तचर विभागाने दिल्ली पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे केजरीवालांची सुरक्षा लक्षात घेता त्यांना 'झेड' सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या कौशंबीमधल्या कार्यालयावर हिंदू रक्षा दलाने हल्ला केला होता. केजरीवाल यांचं निवास्थान या कार्यालयाच्या जवळच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aam aadmi party, AAP, Arvind kejriwal, Z security