04 ऑगस्ट : मुंबईतील वरळी भागातील वादग्रस्त कॅम्पा कोला इमारतमधील अनधिकृत फ्लॅट्सना अधिकृत का करता येऊ शकत नाही, याबाबतची विचारणा सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
याबाबत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवलीय आणि या नोटीशीला उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने एकाप्रकारे कॅम्पा कोलांच्या रहिवाशांना आशेचा किरण दाखवलाय.
कॅम्पा कोलातील अनधिकृत घरं खाली करण्याचा आदेश कोर्टाने दिल्यानंतर मोठ्या जडअंतकराने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी घरं खाली केली. सुरुवातीला कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी आपली घरं खाली करण्यास नकार दिला होता.
यासाठी पालिकेच्या विरोधात रहिवाशांनी आंदोलन पुकारले होते. मात्र पालिकेनं आक्रमक भूमिका घेतल्यामुळे रहिवाशांना नमतं घ्यावं लागलं होतं. पालिकेनं तातडीने कारवाई करत या इमारतचे पाणी, वीज कनेक्शन तोडून टाकले आहे. अजूनही इमारतीवर पालिकेची कारवाई सुरू आहे. आता सुप्रीम कोर्टानेच ही अनधिकृत घरे अधिकृत करता येऊ शकत नाही का अशी विचारणा करुन रहिवाशांना दिलासा दिलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++