Home /News /news /

'कॅम्पा कोला'चे अच्छे दिन नव्या सरकारच्या हाती

'कॅम्पा कोला'चे अच्छे दिन नव्या सरकारच्या हाती

s33campa_cola27 ऑक्टोबर : मुंबईतील वादग्रस्त 'कॅम्पा कोला'च्या रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या सरकारची तयारी असेल तर कॅम्पा कोला नियमित करू असं मत सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान व्यक्त केलं आहे. मुंबईतील वरळी भागातील 20 मजली कॅम्पा कोलातील 5 मजले अनधिकृत असल्यामुळे रहिवाशांनी महापालिकेविरोधात आंदोलन पुकारले होते. रहिवाशांनी अनधिकृत इमारतींना मंजुरी द्यावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल देत अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही रहिवाशांनी विरोध केला. अखेरीस पोलिसी कारावाईच्या धाकामुळे रहिवाशांना नमतं घ्यावं लागलं. रहिवाशांनी घरं खाली केली. आज पुन्हा एकदा कॅम्पा कोलाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावेळी नव्या सरकारने जर कॅम्पा कोलाच्या अनधिकृत बांधकामाला नियमित करण्याचा निर्णय दिला तर कोर्टाची हरकत नसणार असं मत नोंदवलंय. विशेष म्हणजे भाजप नेते आधीपासूनच कॅम्पाकोलाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे या बाबीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा या सर्व नेत्यांनी वेळोवेळी कॅम्पाकोला वासियांना आश्वासनं देत होते. त्यामुळे भाजपचं सरकार कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना दिलासा देते का हे पाहण्याचं ठरणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, Mumbai, Varli, कॅम्पा कोला, सरकार, सुप्रीम कोर्ट

पुढील बातम्या