जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कहाणी एका जिद्दीची...

कहाणी एका जिद्दीची...

कहाणी एका जिद्दीची...

22 जुलै : जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही, असं म्हणतात. असंच काहीसं उदाहरण आहे लखनौमधल्या मोनिका सिंगचं पाच वर्षांपूर्वी तिच्यावर जीवघेणा ऍसिड हल्ला झाला. यात तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. मानेखालचा भागही भाजला गेला. पण या प्रसंगावरही मोनिकानं मात करत नव्या जिद्दीनं ती उभी झालीय. लखनौमधल्या 28 वर्षांच्या मोनिका सिंगची ही गोष्ट आहे. मोनिका लखनौमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIFTच्या अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. याच काळात अशी घटना घडली की तिचं आयुष्यच बदललं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    22  जुलै :  जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही, असं म्हणतात. असंच काहीसं उदाहरण आहे लखनौमधल्या मोनिका सिंगचं पाच वर्षांपूर्वी तिच्यावर जीवघेणा ऍसिड हल्ला झाला. यात तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. मानेखालचा भागही भाजला गेला. पण या प्रसंगावरही मोनिकानं मात करत नव्या जिद्दीनं ती उभी झालीय.

    लखनौमधल्या 28 वर्षांच्या मोनिका सिंगची ही गोष्ट आहे. मोनिका लखनौमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIFTच्या अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. याच काळात अशी घटना घडली की तिचं आयुष्यच बदललं. लग्नाला नकार दिल्यानं तिच्यावर 5 गुंडांनी ऍसिड फेकलं. यात तिचा चेहरा आणि मानेखालचा भाग पूर्णपणे भाजला गेला.

    जाहिरात

    इतकं सगळं होऊनही मोनिका खचली नाही. यात भयानक घटनेतून बाहेर पडत असताना आतापर्यंत तिच्यावर 43 सर्जरीज झाल्यायत. इतकंच नाही तर तिनं पुन्हा NIFTमध्ये प्रवेश घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं.

    मोनिकाला इथेच थांबायचं नाही. तिला यापुढे न्यूयॉर्कमधल्या कॉलेजमधून फॅशन मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय.

    पण, तिच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते कॉलेजची फी, त्यासाठी तिने एक वेबसाईट उघडून क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी जमवण्याचा प्रयत्न करतेय.

    तुम्हाला करायचं फक्त एवढचं आहे की तुम्हाला लॉग ऑन करायचं www.makelovenot scars.com वर आणि तुम्हाला शक्य तेवढी मदत करा. तुमच्या या छोट्याशा मदतीनं मोनिकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात