जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कन्हैय्याला पुण्यात येण्यास बंदी घालणं अयोग्य - श्रीपाल सबनीस

कन्हैय्याला पुण्यात येण्यास बंदी घालणं अयोग्य - श्रीपाल सबनीस

 कन्हैय्याला पुण्यात येण्यास बंदी घालणं अयोग्य - श्रीपाल सबनीस

पुणे – 30 मार्च : कन्हैय्याकुमारवर पुण्यात यायला बंदी घालणं योग्य नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. कन्हैय्याला बोलू न देणं हे घटना विरोधी असून ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असंही सबनीस म्हणाले. पण तो देशद्रोही आहे का हे अजून ठरायचंय. त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. मात्र त्याला आता दोषी अगर निर्दोष, असं काहीही ठरवू नका ही माझी तिसरी भूमिका असेही सबनीस यांनी सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :
    shripal Sabnavis 43323

    पुणे – 30 मार्च :  कन्हैय्याकुमारवर पुण्यात यायला बंदी घालणं योग्य नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. कन्हैय्याला बोलू न देणं हे घटना विरोधी असून ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असंही सबनीस म्हणाले. पण तो देशद्रोही आहे का हे अजून ठरायचंय. त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. मात्र त्याला आता दोषी अगर निर्दोष, असं काहीही ठरवू नका ही माझी तिसरी भूमिका असेही सबनीस यांनी सांगितलं.

    जाहिरात

    कन्हैय्याकुमार पुण्यात येण्यार असल्याच्या प्रकरणावरुन सध्या वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सबनीस बोलत होते.

    तसंच यावेळी त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीबाबतही यावेळी टिका केली. राजकारणी जर साहित्य संमेलनाच्या निवडणुकीतून ट्रेनिंग घेत असतील तर हा साहित्यिकांचा पराभव आहे. मसाप निवडणुकीत कुरूप राजकारण दिसू नये, असला राजकीय अड्डा होण्यापेक्षा सांस्कृतिक गड्डा बनावे. साहित्य महामंडळाने खरकटी भांडी धुवावीत, अशी टिका त्यांनी केली. तसेच मसाप जानव्यात अडकली आहे. सर्व जाती धर्म घटकांना स्थान द्या, असंही त्यांनी सुनावलं.

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात