औरंगाबाद -16 जुलै : वैजापूर तालुक्यातील धोंदलगावात सावकाराने महिलेला विष पाजल्याची घटना समोर आलीये. पुष्पा प्रकाश शिंदे या महिलेला सावकाराने विष वाजल्याचा आरोप महिल्याच्या कुटुंबीयांनी केलाय. शिंदे कुटुंबियांनी आरोप केलेले अप्पासाहेब हिवाळे हे भाजपचे नगरसेवक आहेत.
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील धोंदलगावात पुष्पा शिंदे या महिलेनं अप्पासाहेब हिवाळे या सावकाराने विष पाजल्याचा आरोप केलाय. विशेष म्हणजे अप्पासाहेब हिवाळे हे औरंगाबाद महानगर पालिकेचे सातारा देवळाईचे या भागातील भाजपचे नगरसेवक आहेत. प्रकाश शिंदे यांनी अप्पासाहेब हिवाळे यांच्याकडून 2005 मध्ये सात लाख रुपये व्याजाने घेतले. चार वर्ष व्याज भरल्यावर काही वर्ष त्यांना व्याज देणे जमले नाही. त्यावेळी अप्पासाहेब हिवाळे यांनी त्यांची चार एकर जमीन पैसे परत येईपर्यंत सुरक्षेसाठी आपल्या नावावर करून घेतली. त्यानंतर शिंदे कुटुंबीयांनी बरेचशे पैसे हिवाळे यांनी परत दिले. त्यानंतर मात्र गुरुवारी हिवाळे आणि त्यांच्या साथीदार शिंदे यांच्या शेतात आले आणि त्यांनी शिंदे यांना शेत रिकाम करण्याची जबरदस्ती केल्याची तक्रार प्रकाश शिंदे या शेतकार्याने केलीये. पुष्पा यांना वैजापूरमधील रुग्णालयात दाखल केले.मात्र शिंदे कुटुंबीय खोटे आरोप करत असल्याचा खुलासा नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांनी केलाय. 2009 मध्ये आपण जमीन विकत घेतली असून आपण त्या जमिनीवर शेती करत असल्याचं हिवाळे यांनी सांगितलं. शिंदे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि दंगलीचा गुन्हा वैजापूर पोलिसांत दाखल करण्यात आलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







