27 ऑक्टोबर: ‘ऐ दिल है मुश्किल’ 28 ऑक्टोबरला रिलीज होतेय. फवाद खानवरच्या वितंडवादानंतर आता चर्चा आहे ती रणबीर-ऐश्वर्यामधल्या केमिस्ट्रीची. रणबीर-ऐश्वर्यामधले रोमँटिक सिन्स लक्ष वेधून घेतायत. पण हेच दृश्य शूट करताना किती टेंशन आलं हे रणबीरनं मीडियाशी शेअर केलं. रणबीर म्हणाला की, ऐश्वर्यासोबत शॉट्स देताना मला लाज वाटायची. मी अक्षरश: थरथरायचो. पण ऐश्वर्यानं मला कंफर्टेबल केलं. ती म्हणाली, आपण अभिनय करतोय. तू तुझं काम कर. तेव्हा कुठे शूटिंग सुरळीत सुरू झालं. रणबीर पुढे असंही म्हणाला की, सेटवर ऐश्वर्या राय बच्चनची एन्ट्री झाली तेव्हा मला जाणवलं खरोखर मोठी स्टार आलीय. तिचं लूकच सगळं सांगून जातं.सिनेमाच्या प्रोमोमध्ये दिसणारी दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv