Home /News /news /

'हॅपी' सुरुवात होऊ शकते,राजनी दिले उद्धवशी चर्चेचे संकेत

'हॅपी' सुरुवात होऊ शकते,राजनी दिले उद्धवशी चर्चेचे संकेत

raj_on_udhav_thackarey18 एप्रिल:उद्धव ठाकरेंशी राजकीय मतभेद असतील पण कौटुंबिक मतभेद नाहीत. भविष्यात सेनेसोबत हॅपी सुरूवात होऊ शकते असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चेचे संकेत दिले आहे. आयबीएन नेटवर्कचे संपादक राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या खास मुलाखतीत राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका, नरेंद्र मोदींना पाठिंबा आदी विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचं पुढे काय ? बाळासाहेबांचा वारसा पुढे कोण नेणार? अशी प्रश्न उपस्थित झाली होती. या प्रश्नांना पुर्णविराम देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. त्यानंतर त्यांनी 'दै.सामना'मधून राज ठाकरेंना 'टाळी'साठी हात पुढेही केला होता. पण राज यांनी 'टाळी'ला टोला लगावला आणि एकत्र येण्यास स्पष्ट नकार दिला.

यानंतर भाजपच्या नेत्यांनी अनेक वेळा यासाठी प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपने ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा यासाठी प्रयत्न केला. पण राज यांनी काही टाळी दिली नाही. अलीकडेच 'मैत्रीचा पूल' बांधण्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही राज यांची भेट घेऊन महायुतीत येण्याचा आग्रह धरला. पण गडकरींच्या हाती काही लागले नाही. गडकरींच्या हाती काही लागले नसले तरी राज यांचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना यश मिळाले. त्याचे पडसाद अलीकडेच झालेल्या राज ठाकरेंच्या सभेमधून दिसून आले. राजकारणाच्या पटलावर भविष्याचा वेध घेत अलीकडेच 'टाळी'साठी हात पुढे करण्याचा प्रयत्न राज करत आहे. याच निमित्ताने आयबीएन नेटवर्कचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज यांनी आपल्या ठाकरी शैलीत सडेतोड उत्तर दिली.

लोकसभेचं टार्गेट : 'नरेेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पाहायचंय' लोकसभा निवडणुकीत आमचं एकमेव टार्गेट म्हणजे नरेंद्र मोदी यांना देशाच्या पंतप्रधानपदी पाहणे हेच आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात निवडणुकीसाठी मैदानात उतरलेलो नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभं करण्यात आली असं काहीच नाही. काँग्रेसचा पराभव व्हावा आणि मोदी पंतप्रधान व्हावे यासाठीच आम्ही निवडणूक लढवत आहोत. जर राजनाथ सिंह जर पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी सांगत असतील तर त्याची गरजच नाही. आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे भाजपला नाही. आज भाजपलाच मोदींची गरज आहे. सरकार मोदीचं येणार आहे, राजनाथ यांचं नाही किंवा कमळ सरकारही येणार नाही. तर मोदींचं सरकार येणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने गुजरातमध्ये काम केलंय ते पाहुनच त्यांना पाठिंबा दिलाय. गडकरी-मुंडे भेटीवर खुलासा एकत्र येण्यासाठी नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेंनी आपली भेट घेतली होती. गडकरींनी भेट घेऊन एकत्र येण्याचा सल्लाही दिला. पण जर आम्ही एकत्र आलो तर जागाचं वाटप कसं होणार ? आणि एकत्र कसं यायचं ? असा सवाल केला असता विचारुन सांगतो असं उत्तर त्यांनी दिलं आता हे कुणाला विचारणार हे मला अजूनही कळलं नाही असा खुलासा राज यांनी गडकरींच्या भेटीवर केला. गडकरींच्या भेटीनंतर मुंडेंनीही फोन करुन भेटीसाठी वेळ मागितली होती असंही राज यांनी सांगितलं. 'मराठीच्या मुद्यावर जिंकलो' शिवसेना आणि मनसेचा मुद्दा आला तर मराठी माणसाची विभागणी केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे. मराठी माणूस आज काँग्रेसला मत देतो, राष्ट्रवादीला मत देतो, शेकापला मत देतो उद्या 'आप'लाही मत देईल. मग शिवसेना आणि मनसेचा मुद्दा आला तर मराठी माणसाची मतांसाठी विभागणी कशी होणार ? शिवसेनाप्रमुखांच्या ह्यातीत पक्ष काढला. त्यांच्या पाठीमागे पक्ष काढला नाही. मराठीचा मुद्दा शिवसेनेचा असला तरी मराठीच्या मुद्यावर आम्ही पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले मग तेव्हा मतांचे विभाजन का झाले नाही ? असा सवाल करत मराठीच्या मुद्यावर आपण जिंकून आल्याचं त्यांनी कबूल केलं. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद पाहुन घ्या आमचा पक्षहा मीडियाचा पक्ष नाही. जे आले होते 49 दिवसात संपले. हात तुरे घालून, धरणं धरून कुणी पक्ष निर्माण करू शकत नाही मला तसा पक्षही निर्माण करायचा नाही असं सांगत राज यांनी 'आप'ला टोला लगावला. गेल्या निवडणुकीत मतांची टक्केवारी पाहा. नाशिकमध्ये पुर्वी 8 जागा होत्या त्या आता 40 झाल्या आहे. पुण्यात 7 जागा होत्या त्या 29 झाल्या आहेत. माझ्या आणि इतर पक्षांच्या सुरुवातीच्या आठ वर्षांच्या कारभाराचा हिशेब करून पाहा तुम्हाला लक्षात येईल. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद पाहुन घ्या असंही राज म्हणाले. हॅपी सुरुवात होऊ शकते उद्धव ठाकरे आणि आमच्यात राजकीय मतभेद असतील पण कौटुंबिक मतभेद नाहीत. त्यामुळे भविष्यात चर्चा करायला हरकत नाही. पुढे चालून हॅपी सुरूवात होऊ शकते असे संकेतही राज ठाकरे यांनी दिले. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published:

Tags: MNS, Raj speech, Raj Thackray, उद्धव ठाकरे, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, शिवसेना

पुढील बातम्या