मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'आर्ची आली आर्ची...',अखेर रिंकू परीक्षेला पोहचली

'आर्ची आली आर्ची...',अखेर रिंकू परीक्षेला पोहचली

    rinku407 मार्च : आर्ची आली आर्ची...ही हाक ऐकू आली ती परीक्षा केंद्रावर...सैराट चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू आज 10 च्या परीक्षेला हजर झाली. यावेळी परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी तिचं फुल देऊन स्वागतही केलं.

    सैराटच्या अपार यशानंतर रिकू राजगुरू सात वे आसमानवर पोहचली. अकलुजची ही कन्या रातोरात सुपरस्टार झाली. आठवीमध्ये असताना सैराट चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.  त्यानंतर नववीची परीक्षा दिली तेव्हा सैराट रिलीज झाला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिला वेळ काढवा लागला. तरीही नववीत तिला 81 टक्के मार्क मिळाले. त्यानंतर शालेय आयुष्यात महत्वाच्या अशा दहावीकडे मात्र तिचं दुर्लक्ष झालं. गेली वर्षभर रिंकू शाळेत जाऊ शकली नाही.

    आज 10 च्या परीक्षेला सुरूवात झालीये. रिंकूही पेपर सोडवण्यासाठी अकलूजच्या जिजामात कन्या प्रशाला परीक्षा केंद्रावर पोहचली. याच शाळेची ती विद्यार्थीनी आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थिनीने मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर दहावीतही यश मिळावं यासाठी त्यांनी शिक्षकांनी तिचं गुलाब देऊन स्वागत केलं.

    सध्या आर्चीचा सैराट कन्नडमध्ये रिमेक 'मनसू मल्लिगे' येतोय. या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालंय. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लाँच झाली आहे. चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर आर्ची आपल्या गावी अकलूजला महिन्याभरापूर्वी आली. महिनाभर परीक्षेची तयारी करून आज रिंकू परिक्षेला पोहचली.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


    First published:
    top videos