मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /आपली रेल्वे आणि तिच्यापुढची आव्हानं

आपली रेल्वे आणि तिच्यापुढची आव्हानं

  indian railway

  08 जुलै : भारतावर दीडशे वर्ष राज्यकरून ब्रिटिश गेले पण जाताना त्यांनी अखंड भारताच्या दळवळणाला मोठा हातभार लावणारी रेल्वे देऊन गेले. पण गेल्या अनेक वर्षात कोकण रेल्वे वगळता भारतीय रेल्वेनं कोणतीही अशी खास सुधारणा केली नाही. मध्यंतरीच्या यूपीएच्या काळात माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्वे नफ्यात आणण्याचा भीम पराक्रम करुन दाखवला होता. पण आता रेल्वे तब्बल 26 हजार कोटीचा तोटा सहन करत आहे. रेल्वेनं प्रतिदिन 2.31 कोटी प्रवाशी प्रवास करता तर प्रतिदिन तब्बल 2.76 मेट्रिक टन मालवाहतूक होत असते. तसंच 7,421 पॅसेंजर रेल्वे आणि मालवाहतूक करणार्‍या 12,617 रेल्वे अखंडपणे धावत आहे. पण रेल्वेपुढे अनेक आव्हानांचा डोंगर आहे. त्यात प्रवाशांची सुरक्षा, प्लॅटफॉर्मवर रेल्वे डब्यांमधील स्वच्छता महत्वाचे मुद्दे आहे. त्याचबरोबर मोजक्याच कर्मचार्‍यांच्या डोक्यावर रेल्वे खात्याचा भार आहे. त्यामुळे रेल्वे बजेटमध्ये काय घोषणा केल्या जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  रेल्वेपुढील आव्हाने

  प्रवाशांची सुरक्षा

  • प्लॅटफॉर्मवरील आणि रेल्वे डब्यांमधील स्वच्छता
  • किंमत आणि गरजेवर आधारित कर्मचारी संख्या वाढवणे
  • रेल्वे बोर्डाची पुनर्रचना करणे
  • वाहतूक वाढवण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे

  कशी आहे भारतीय रेल्वे ?

  • प्रतिदिन प्रवासी संख्या 2.31 कोटी
  • प्रतिदिन होणारी मालवाहतूक 2.76 मेट्रिक टन
  • प्रतिदिन धावणार्‍या पॅसेंजर ट्रेन्स 7,421
  • प्रतिदिन मालवाहतूक करणार्‍या ट्रेन्स 12,617
  • देशातील रेल्वे स्टेशन्स 7,172
  • दररोज कापलं जाणारं अंतर 65,436 किमी
  • विद्युतीकरण झालेले मार्ग 20,884 किमी
  • रेल्वे कर्मचारी संख्या 13.07 लाख

  First published:

  Tags: Narendra modi, NDA, Sadananda gowda, Train, अर्थसंकल्पीय अधिवेशन