27 जुलै : ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं आज (सोमवारी) संध्याकाळी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते स्टेजवरच कोसळले. हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते.
शिलाँग इथे आयआयएममध्ये सोमवारी एपीजे अब्दुल कलाम यांचं भाषण सुरू होते. कलाम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते मंचावरच कोसळले. यानंतर त्यांना तातडीने शिलाँगमधल्या बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर प्रोटोकॉलनुसार आर्मीच्या डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली.
कलाम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1931 रामेश्वरम इथल्या एका खेड्यात झाला होता. एका नावाड्याच्या घरात जन्मलेल्या कलाम यांनी अविरत मेहनत घेत विज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. कलाम यांनी भारतीय अवकाश कार्यक्रमात मोठं योगदान दिलं. नंतर ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. हा लोकप्रिय शास्त्रज्ञ पुढे जाऊन देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर साधेपणामुळे ते ओळखले जात होते. कलाम यांचा प्रवास ‘अग्निपंख’ या आत्मचरित्राच्या रूपाने तरुण पिढीसाठी प्रेरणेचा अविरत स्रोत आहे. या भारतरत्नाच्या अचानक जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++