जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अण्णा पुन्हा जंतरमंतरवर,भूसंपादन विरोधी आंदोलनात सहभागी

अण्णा पुन्हा जंतरमंतरवर,भूसंपादन विरोधी आंदोलनात सहभागी

अण्णा पुन्हा जंतरमंतरवर,भूसंपादन विरोधी आंदोलनात सहभागी

23 फेब्रुवारी : पुन्हा एकदा अण्णा जंतरमंतरवर दिसणार आहे. भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर धरणं आंदोलन होत आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह मेधा पाटकर, राजेंद्र सिंहही असणार आहे. या आंदोलनाला आप सरकारने पाठिंबा दिलाय. मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात आजपासून दिल्लीमध्ये 2 दिवसांचं धरणे आंदोलन होतंय. हा अध्यादेश शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होतो आहे. या आंदोलनात देशभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था सहभागी होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    46anna_on_jain 23 फेब्रुवारी : पुन्हा एकदा अण्णा जंतरमंतरवर दिसणार आहे. भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर धरणं आंदोलन होत आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह मेधा पाटकर, राजेंद्र सिंहही असणार आहे. या आंदोलनाला आप सरकारने पाठिंबा दिलाय.

    मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात आजपासून दिल्लीमध्ये 2 दिवसांचं धरणे आंदोलन होतंय. हा अध्यादेश शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होतो आहे. या आंदोलनात देशभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था सहभागी होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर, राजेंद्र सिंह आणि इतर अनेक जण या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनात काँग्रेसच्या सहभागाविषयी अण्णा हजारेंना विचारले असता ते ंम्हणाले की, राहुल गांधी या आंदोलनात येऊ शकतात पण त्यांना जनतेबरोबर बसावं लागेल. जंतरमंतरवर होणारं हे आंदोलन मोदी सरकार कशा प्रकारे हाताळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात