कोल्हापूर 20 जून : शहरातल्या सीरियल किलिंगमधल्या 2 खूनांचा शोध लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय. याप्रकरणी दिलीप लेहरिया या तरुणाला अटक करण्यात आली असून त्यानं 2 खुनांची कबुली दिलीय. कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. कोल्हापूर शहरात गेल्या 2 महिन्यांमध्ये शहरात 9 खून झाले. त्यातले 7 खून हे डोक्यात दगड घालून करण्यात आलेत. दिलीप लेहरिया हा मुळचा छत्तीसगड मधला असून तो गेली 11 महिने कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता. तोही एक भिकारीच असून भीक मागण्याच्या वादातून त्यानं इतर 2 भिकार्यांचे खून केल्याचं उघड झालंय. बुधवारी मध्यरात्री शहरातल्या टाऊन हॉल परिसरातून त्याला अटक करण्यात आलीय. लेहरिया हा विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे. मात्र पत्नीनं त्याला सोडून दिल्यानंतर तो छत्तीसगडमधून नागपूरला आला आणि त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये आला. 13 जून रोजी भिकार्यांच्यात त्याचा वाद झाला आणि त्यानं रागातून इतर दोन्ही भिकार्यांचे खून केले. दरम्यान, लेहरिया याला जरी अटक करण्यात आली असली तरीही इतर खुनांचा तपास करण्याचं आव्हान कोल्हापूर पोलिसांसमोर आहे. -
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.