जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अखेर राहुल गांधींची 'घरवापसी'

अखेर राहुल गांधींची 'घरवापसी'

 अखेर राहुल गांधींची 'घरवापसी'

16 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 56 दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आज (गुरूवारी) सकाळी मायदेशी परतले आहेत. ते आज सकाळी 11च्या सुमाराला थाय एअरवेजने दिल्लीत दाखल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , राहुल गांधी इतके दिवस म्यानमार इथल्या यांगूनमध्ये एका प्रसिद्ध ध्यानसाधना केंद्रात होते. ते काल रात्रीच परतणार होते, पण बँकॉकहून येणारे विमान उशिरा आल्याने राहुल गांधी आज सकाळी दिल्लीत परतले. दरम्यान, राहुल गांधींना भेटण्यासाठी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :
    rahul-gandhi-arrives-to-address-a-rally-at-shahid-minar-ground-131

    16  एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 56 दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आज (गुरूवारी) सकाळी मायदेशी परतले आहेत. ते आज सकाळी 11च्या सुमाराला थाय एअरवेजने दिल्लीत दाखल झाले.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , राहुल गांधी इतके दिवस म्यानमार इथल्या यांगूनमध्ये एका प्रसिद्ध ध्यानसाधना केंद्रात होते. ते काल रात्रीच परतणार होते, पण बँकॉकहून येणारे विमान उशिरा आल्याने राहुल गांधी आज सकाळी दिल्लीत परतले.

     दरम्यान, राहुल गांधींना भेटण्यासाठी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. येत्या 19 तारखेला काँग्रेसने भूसंपादनाच्या वटहुकूमा-विरोधात दिल्लीमध्ये एक भव्य रॅली आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये राहुल गांधीही सहभागी होतील असं काँग्रेसच्या ज्यष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येतं आहे.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात