जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अंधेरीत गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार

अंधेरीत गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार

अंधेरीत गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार

मुंबई – 07 फेब्रुवारी : अंधेरीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेशातील गुरगावचा कुख्यात गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार झाला आहे. एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली. संदीप गाडोली हा उत्तर प्रदेशातील गुरगावचा कुख्यात गँगस्टर होता. त्याच्यावर हत्येच्या आरोपासह अनेक गुन्ह्यांची नोंद होती. तसंच, त्याच्यावर 1.25 लाखांचं इनामही जाहीर झालं होतं. संदीप हा मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या क्राईम ब्रँचचं एक पथक इथे आलं होतं. तेव्हा तो एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :
    gadoli-lead

    मुंबई – 07 फेब्रुवारी : अंधेरीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेशातील गुरगावचा कुख्यात गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार झाला आहे. एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली.

    संदीप गाडोली हा उत्तर प्रदेशातील गुरगावचा कुख्यात गँगस्टर होता. त्याच्यावर हत्येच्या आरोपासह अनेक गुन्ह्यांची नोंद होती. तसंच, त्याच्यावर 1.25 लाखांचं इनामही जाहीर झालं होतं.

    संदीप हा मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या क्राईम ब्रँचचं एक पथक इथे आलं होतं. तेव्हा तो एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. दरम्यान, पोलीस संदीपच्या रुमवर अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी प्रत्यूत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संदीप ठार झाला.

    जाहिरात

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात