Home /News /national /

योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?

योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?

योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याला धडकल्यानंतर पोलिस लाईनमध्येच त्यांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी केली जात आहे.

    लखनौ 26 जून : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी आदळल्याची घटना समोर आली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग (Helicopter Emergency Landing) करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रस्त्याने सुलतानपूरला नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) वाराणसी दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी योगी वाराणसीत होते. पोलिस लाईनमधून त्यांचे हेलिकॉप्टर सुलतानपूरसाठी निघाले होते, मात्र पक्ष्याला धडकल्यानंतर पोलिस लाईनमध्येच त्यांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी केली जात आहे. एक विमान लखनौहून वाराणसीला (Varanasi) रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता सीएम योगी या विमानातून जाणार आहेत. सीएम योगी यांचे हेलिकॉप्टर सुखरूप उतरल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. इमर्जन्सी लँडिंगनंतर सीएम योगी कारने सर्किट हाऊसमध्ये पोहोचले. शनिवारी मुख्यमंत्री लखनऊहून विशेष हेलिकॉप्टरने वाराणसीला पोहोचले होते. आपल्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी वाराणसीतील सर्किट हाऊसमध्ये लोकप्रतिनिधींची भेट घेतली. याशिवाय येथील सर्व विकास योजनांचा आढावा घेण्याची त्यांची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीच्या नियोजित दौऱ्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या सर्व योजनांचा आढावा घेतील. याशिवाय ते वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरातही दर्शन पूजा करणार आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Yogi Aadityanath

    पुढील बातम्या