नवी दिल्ली, 30 मे : जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यानंतर दिल्ली हायकार्टाने यासिन मलिकसाठी एक नोटीस पाठवली आहे. या बातमीनंतर त्याची पत्नी मुशाल मलिक अश्रू अनावर झाले. यावेळी तिने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारतात माझ्या पत्नीची हत्या होऊ शकते : मुशाल मलिक यासीन मलिकची पत्नी मुशाल मलिकने पाकिस्तानला सांगितले आहे की, भारतात आपल्या पतीची न्यायालयीन हत्या केली जाऊ शकते. मुशाल पाकिस्तानमधील पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशनची (पीसीओ) अध्यक्ष आहे. लाहोरमधील जिना हाऊसमध्ये माध्यमांना संबोधित करताना ती म्हणाली की भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) प्रमुख यासिन मलिकला पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुशाल भारतावर संतापली फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशाल भारतावर संतापली आहे. तिने पाकिस्तानला पतीला वाचवण्याची विनंती केली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पतीला फाशी होऊ शकते, असा दावा मुशाल मलिकने केला आहे. यासिन मलिकच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आवाज उठवण्याची मागणी तिने पाकिस्तानकडे केली आहे. यासिन मलिक हा पाकिस्तानचा जुना मोहरा आहे. तो आधी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये सामील होता आणि नंतर आत्मसमर्पण करून फुटीरतावादी गट हुर्रियत कॉन्फरन्समध्ये सामील झाला. वाचा - Shocking News: लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीची ओढणी घेऊन गेला अन्.., नवरदेवाचं धक्कादायक पाऊल कोण आहे मुशाल हुसेन मलिक? काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक आणि मुशाल हुसेन मलिक यांच्यात पती-पत्नीचे नाते आहे. या दोघांची 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये भेट झाली होती. 2005 च्या भेटीनंतर यासिन आणि मुशाल यांची ओळख वाढत गेली. 2009 मध्ये मुशाल हुसेन मलिक हिने यासिन मलिकसोबत विवाह केला होता. फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.