14 फेब्रुवारी : एकीकडे अयोध्येतून रामराज्य रथयात्रा सुरू होतेय तर दुसरीकडे लाल किल्ल्याच्या मैदानावर भाजप खासदार महेश गिरी यांनी राष्ट्र रक्षा महायज्ञाचं आयोजन केलंय. 18 ते 25 मार्च दरम्यान होणाऱ्या या यज्ञात 108 कुंड तयार करण्यात येणार आहेत. देशातल्या सीमारेषा, चार धामची माती आणि पाणी आणून हे यज्ञकुंड तयार केले जाणार आहेत. बुधवारी दिल्लीतील इंडिया गेटपासून एक रथ ही माती आणि पाणी आणायला रवाना झाला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. भारताचे अंतर्गत आणि बाह्य शत्रुंचे इरादे असफल व्हावेत, देशभक्तांना बळ मिळावं, म्हणून हा महायज्ञ आयोजित केल्याचा दावा महेश गिरी यांनी केलाय. तर निवडणुका जवळ येवू लागल्यामुळे भाजपने देशात रथयात्रा, महायज्ञ सुरू केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.