जाहिरात
मराठी बातम्या / देश / यास चक्रीवादळाचा फटका; एक कोटी जनता प्रभावित: ममता बॅनर्जी

यास चक्रीवादळाचा फटका; एक कोटी जनता प्रभावित: ममता बॅनर्जी

यास चक्रीवादळाचा फटका; एक कोटी जनता प्रभावित: ममता बॅनर्जी

यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसासह आणि वादळी वारे वाहत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकात्ता, 26 मे: यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसासह आणि वादळी वारे वाहत आहेत. या पमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या चक्रीवादळामुळे जवळपास एक कोटी लोकं प्रभावित झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (WB CM Mamata Banerjee) यांनी दिली आहे. तसंच 15 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. या चक्रीवादळात पश्चिम बंगालमधील तीन लाख घरांचं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळात नुकसानग्रस्त मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा भागांचा दौरा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगतिलं. चक्रीवादळात बाधित झालेल्या भागासाठी आम्ही एक कोटी रुपयांची मदत पाठविली असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी यास चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

जाहिरात

सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.

ओडिशात यास चक्रीवादळामुळे भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून धामरा जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. वादळामुळे कोसळलेली झाड हटवण्याचं काम देखील सुरु करण्यात आलं आहे.

जाहिरात

यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागनं वर्तवला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात