Home /News /national /

World Day Against Child Labour 2022: लहान मुलांकडून काम करुन घेण्याआधी हे वाचा; अन्यथा जेलशिवाय पर्याय नाही

World Day Against Child Labour 2022: लहान मुलांकडून काम करुन घेण्याआधी हे वाचा; अन्यथा जेलशिवाय पर्याय नाही

जागतिक बालकामगार प्रतिबंध दिवस दरवर्षी 12 जून (World Day Against Child Labour 2022) रोजी जगभरात साजरा केला जातो. 14 वर्षांखालील मुलांना शिक्षण मिळावे आणि त्यांना काम न करता पुढे जाण्याची जाणीव व्हावी हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे. दरवर्षी त्याची वेगळी थीम असते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 जून : दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात जागतिक बालकामगार निषेध दिन (World Day Against Child Labour) म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 20 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केली होती. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की 14 वर्षाखालील मुलांना श्रम करू न देता त्यांना सुशिक्षित करून पुढे जाण्यासाठी जागरुक करणे. जेणेकरून मुलांची स्वप्ने आणि बालपण हरवू नये. आजच्या दिवसानिमित्त याचा इतिहास, संघटना आणि यावर्षीची थीम काय आहे? हे जाणून घेऊया. या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. बालमजुरी थांबवणे हा देखील हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी 12 जून या जागतिक दिनानिमित्त बालकामगारांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. सरकार, नियोक्ते आणि कामगार संघटना, नागरी समाज तसेच जगभरातील लाखो लोकांना जागरूक केले जाते आणि त्यांच्या मदतीसाठी अनेक मोहिमा देखील चालवल्या जातात. अशी अनेक मुलं आहेत जी अगदी लहान वयातच आपलं बालपण गमावून बसतात. 5 ते 17 वयोगटातील मुले अशा कामात गुंतलेली असतात ज्यामुळे त्यांचे सामान्य बालपण हिरावले जाते आणि ते शिक्षण आणि आरोग्यापासून दूर जातात. विकसनशील देशात परिस्थिती वाईट विकसनशील देशांची सरकारे सामाजिक सुरक्षा योजनांवर फारच कमी खर्च करतात.त्यामुळे जगातील 74 टक्के देशातील 90 टक्के मुलांना सामाजिक सुरक्षा कवच मिळत नाही. श्रीमंत देशांनी सामाजिक सुरक्षेला खूप प्राधान्य दिले आहे. गरीब देशांतील लसींबरोबरच कोरोनामुळे अत्यंत गरिबी आणि बालमजुरीमध्ये ढकलल्या जात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्या मुलांच्या सामाजिक सुरक्षेसाठी बजेटमध्ये वाढ करून जागतिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था तयार करण्याच्या योजनेला भारत पाठिंबा देऊ शकतो. या दिवसामुळे आपल्या देशात रोजगार हमीची मनरेगा योजना, शाळांमध्ये माध्यान्ह भोजन कार्यक्रम, मागासलेल्या व वंचित समाजातील मुलांसाठी विशेषत: मुलींसाठी स्टायपेंडची तरतूद. यामुळे मुलांचे बालमजुरीचे प्रमाण कमी झाले आहे. ब्राझीलमध्ये, गरीब कुटुंबांसाठी सशर्त रोख सहाय्य कार्यक्रमामुळे बालमजुरीमध्ये घट होण्याबरोबरच शाळेतील नोंदणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. 2022 च्या जागतिक बालकामगार प्रतिबंध दिनाची थीम बालकामगार निषेध दिनासाठी दरवर्षी जगात एक थीम निवडली जाते. 2022 ची थीम "बालमजुरी समाप्त करण्यासाठी Universal Social Protection to End Child Labour म्हणजे बालमजुरी समाप्त करण्यासाठी सार्वत्रिक सामाजिक संरक्षण" आहे. हे काम बालमजुरी नाही मुलांच्या किंवा किशोरवयीनांच्या आरोग्यावर आणि वैयक्तिक विकासावर परिणाम न करणारे काम बालमजुरी म्हणून गणले जात नाही, जसे की शाळेच्या वेळेबाहेर किंवा शाळेच्या सुट्टीच्या वेळी कौटुंबिक व्यवसायात मदत करणे. यामुळे मुलाच्या विकासात मदत होते आणि त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. मोठे झाल्यावर समाजाचे उत्पादक सदस्य बनण्यास तयार असतात, ते देखील बालमजुरीत मोडत नाहीत. मात्र, त्याव्यतिरिक्त कोणी काम करुन घेत असेल तर ते बालमजुरीत मोडते. असं आढळल्यास कायद्यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. भारतातील बालकामगारांची संख्या 2011 च्या जनगणनेनुसार, 5-14 वयोगटातील मुलांची लोकसंख्या भारतात सुमारे 26 कोटी आहे. एकूण 26 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 10 दशलक्ष (सुमारे 4%) बालकामगार आहेत जे मुख्य किंवा सीमांत कामगार म्हणून काम करतात. ज्यामध्ये 15-18 वयोगटातील सुमारे 23 दशलक्ष मुले वेगवेगळ्या बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Child labour

    पुढील बातम्या