इंदौर, 30 जानेवारी : इंदौर (Indore) हे आहे देशातील सर्वात स्वच्छ शहर. मात्र इंदौर महापालिका कर्मचारी स्वच्छतेच्या नावावर माणुसकी विसरले आहेत.
इंदौरमध्ये घडलेल्या क्रूर घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. भीक मागून जगणाऱ्या वृद्ध व्यक्तींना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी (municipal corporation)एका गाडीत कोंबलं आणि दुसऱ्याच जागेवर नेऊन सोडलं. या व्यक्तींना गाडीत चढवता-उतरवताना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचाही अजिबात विचार केला गेला नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan) यांच्या आदेशावरून तीन व्यक्तींना निलंबित करण्यात आलं आहे.
याबाबतचा व्हीडिओ शुक्रवारी व्हायरल झाला. इंदौर महापालिकेची एक गाडी घरदार नसलेल्या वृद्धांना शहराबाहेर सोडायला आली होती. मात्र कर्मचाऱ्यांचा हेतू कळताच तिथं उपस्थित लोकांनी विरोध केला. मग हीच गाडी या वृद्धांना आल्यापावली परत घेऊन गेली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही याबाबतचा व्हीडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
इंदौर, मप्र की ये घटना मानवता पर एक कलंक है। सरकार और प्रशासन को इन बेसहारा लोगों से माफी माँगनी चाहिए और ऑर्डर लागू कर रहे छोटे कर्मचारियों पर नहीं बल्कि ऑर्डर देनेवाले उच्चस्थ अधिकारियों पर ऐक्शन होना चाहिए। pic.twitter.com/r47k6Cc6Ox
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 30, 2021
इंदौर नगरपालिकेचा ट्रक काही निराधार आणि वृद्ध व्यक्तींना घेऊन शहराबाहेर देवास हायवेवर पोचला. इथं नगरपालिकेचे कर्मचारी या वृद्धांना गाडीतून खाली उतरवू लागले. यावेळी काही स्थानिकांनी या कर्मचाऱ्यांना विचारणा केली, की इथं या लोकांना तुम्ही का सोडत आहात? यावेळी कर्मचाऱ्यांना निरुत्तर व्हावे लागले.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर उपायुक्त प्रताप सोलंकी यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indore News, Priyanka gandhi vadra, Shivraj singh chauhan