मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबई विमानतळाचं डिझाइन करण्यापासून, मेट्रो चालवण्यापर्यंत कामं करणाऱ्या या सुपर वुमनना भेटा

मुंबई विमानतळाचं डिझाइन करण्यापासून, मेट्रो चालवण्यापर्यंत कामं करणाऱ्या या सुपर वुमनना भेटा

स्टीम टर्बाईन, हैद्राबाद मेट्रो चालवणं, रॉकेट मोटार केसिंग, डिफेन्स मिसाईल सिस्टीम, न्यूक्लिअर कंटेनर हाताळणं यासह अनेक आव्हानात्मक कामांची जबाबदारी महिला पार पाडत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लार्सन अँड टुब्रोमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चार महिलांविषयी जाणून घ्या.

स्टीम टर्बाईन, हैद्राबाद मेट्रो चालवणं, रॉकेट मोटार केसिंग, डिफेन्स मिसाईल सिस्टीम, न्यूक्लिअर कंटेनर हाताळणं यासह अनेक आव्हानात्मक कामांची जबाबदारी महिला पार पाडत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लार्सन अँड टुब्रोमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चार महिलांविषयी जाणून घ्या.

स्टीम टर्बाईन, हैद्राबाद मेट्रो चालवणं, रॉकेट मोटार केसिंग, डिफेन्स मिसाईल सिस्टीम, न्यूक्लिअर कंटेनर हाताळणं यासह अनेक आव्हानात्मक कामांची जबाबदारी महिला पार पाडत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लार्सन अँड टुब्रोमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चार महिलांविषयी जाणून घ्या.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 8 मार्च : बांधकाम किंवा अभियांत्रिकी (Civil Engineering) या क्षेत्रात आतापर्यंत पुरुषांचंच वर्चस्व राहिलेलं दिसत आहे. अभियांत्रिकी म्हणजे जुन्या, नादुरुस्त अवजड यंत्रांबरोबर काम करणारे पुरुष अशी प्रतिमा उभी राहत. त्यामुळे ही क्षेत्रं महिलांसाठी नाहीतच असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अनेक कर्तबगार स्त्रियांनी (Women) हे संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे. या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रोमध्ये अनेक महिला महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. यामध्ये स्टीम टर्बाईन, हैद्राबाद मेट्रो चालवणं, रॉकेट मोटार केसिंग, डिफेन्स मिसाईल सिस्टीम, न्यूक्लिअर कंटेनर हाताळणं यासह अनेक आव्हानात्मक कामांची जबाबदारी महिला पार पाडत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लार्सन अँड टुब्रोमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चार महिलांविषयी जाणून घ्या.

रेणू गुप्ता : वेल्डिंग एक्सलन्स (Welding excellence) -

Reneu

रॉकेट मोटार केसिंग, डिफेन्स मिसाईल सिस्टीम, हेवी वॉटर रिअ‍ॅक्टर्स, फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर्स, न्युक्लियर उपकरण, पेट्रोकेमिकल्स यंत्रणा अशा विविध यंत्रांवर रेणू गुप्ता (Renu Gupta) अतिशय कौशल्यानं काम करतात. हेवी इंजिनीअरिंग विभागात डिझाइन क्यूए आणि डिझाइन फॉर मॅन्युफॅक्चररिंगच्या त्या प्रमुख आहेत. गेल्या वर्षी 2020 मध्ये त्यांनी हे पद स्वीकारलं. या आधी त्या वेल्डींग आणि मेटलर्जी विभागाच्या प्रमुख होत्या. गेली 16 वर्षे त्या लार्सन अँड टुब्रोमध्ये कार्यरत आहेत. वूमन एम्पॉवरमेंट समिट 2019 मध्ये त्यांना इनोव्हेटीव्ह वूमन लीडर ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयआयडब्ल्यू कौन्सिल समितीच्याही त्या सदस्य आहेत. वेल्डिंग टेक्नोलॉजी संदर्भातील भारतीय उद्योग संघटनेच्या विषय समितीच्याही त्या सदस्य आहेत.

सिंधू नायर : स्ट्रक्चरिंग ब्यूटी (Structuring Beauty) -

Sindu

तुम्ही कधी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) टर्मिनल 2 वरून (Terminal 2) विमानासाठी जात असाल, तर त्याच्या छताकडे जरूर लक्ष द्या. सिंधू नायर (Sindhu Nayar) यांनी याचं डिझाइन केलं आहे. त्या मुंबईत लार्सन अँड टुब्रोच्या बिल्डिंग आणि फॅक्टरी विभागातील इंजिनीअरिंग, डिझाइन आणि संशोधन केंद्रामध्ये चीफ इंजिनीअरिंग मॅनेजरपदी कार्यरत आहेत. त्यांना अठरा वर्षांचा अनुभव असून, त्यांनी विमानतळ, व्यावसायिक आणि निवासी इमारती, पाणी प्रक्रिया प्रकल्प, पूल यांचं डिझाइन केलं आहे. यूकेतील इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हील इंजिनीअरिंग या संस्थेच्या भारतातील वूमन इन इंजिनीअरिंग इनिशीएटिव्हच्या त्या अध्यक्ष आहेत. सिंधू नायर यांनी मुंबईतील व्हीजेटीआयमधून सिव्हील इंजिनीअरिंगची पदवी घेतली असून, सध्या आयआयएम अहमदाबादमधून त्या व्यवस्थापनासंदर्भात एक अभ्यासक्रम करत आहेत. नायर यांना संगीताचीही आवड असून, ड्रायव्हिंग आणि कार रेसिंगचाही छंद आहे. त्या प्राणीप्रेमी आहेत. आई-वडील पती यांनी पाठींबा दिल्याने त्या आपल्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडू शकत आहेत. त्यांना मिळणारा रिकामा वेळ त्या आपल्या मुलासोबत घालवतात, असं सिंधू यांनी सांगितलं.

आभा शेठ : पॉवर लेडी (Power Lady) -

Abha

संपूर्ण भारतात ‘कोविड 19’ मुळे लॉकडाउन असतानादेखील लार्सन अँड टुब्रोच्या एमएचआय पॉवर टर्बाइन जनरेटर्सनी आपल्या जपानी ग्राहकाचं शेड्यूल वेळेवर पूर्ण करण्यासाठी 1070 एमडब्ल्यूयू सुपरक्रिटिकल स्टीम टर्बाइनचा पुरवठा केला आहे. त्याला भारतात निर्माण झालेल्या उत्पादनासाठीचं सर्वाधिक चांगलं मानांकन मिळालं आहे. गुजरातच्या वल्लभ विद्यानगरमधील बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयापासून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतलेल्या आभा शेठ (Aabha Sheth) यांनी ट्रेनी म्हणून लार्सन अँड टुब्रोमध्ये प्रवेश केला. कोराडी टीम आणि एल अँड टी पॉवरसाठी ( L&T Power) समन्वित पद्धतीनं चालणाऱ्या डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीची निर्मिती आणि कार्यान्वयन केलं. सुपर क्रिटिकल जनरेटरसाठी 660 मेगावॅट जनरेटर स्टेटर कॉइलचा विकास आणि निर्मितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हजीरा इथं एल अँड टीच्या मोठ्या प्रकल्पातील यंत्रणाही त्यांनी यशस्वीपणे कार्यान्वित केली.

गोवू सुश्रुत : मेट्रो मुव्हर (Metro Mover) -

govu

23 वर्षांची गोवू सुश्रुत तीन वर्षांपूर्वी 1 जानेवारी रोजी हैदराबादच्या नागोले स्थानकावर एका वातानुकूलित मेट्रो रेकच्या अत्याधुनिक कन्सोलिएटमध्ये उभी होती. आत्मविश्वास असला तरी ती थोडी नर्व्हसही होती. कारण एल अँड टी हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडच्या (Hyderabad Metro rail Ltd) ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी तिच्यावर होती. ज्या क्षणी लोक आपल्या जागेवर बसण्यासाठी धावले त्या वेळी तिच्या ह्रदयाचे ठोके देखील वाढले होते. तिला माहिती होतं मायक्रो कंट्रोलर सिस्टीमची काळजी घेईल. तिनं हळूवारपणे छोट्या गियरसारख्या शाफ्टला धक्का दिला. काही बटण दाबली आणि स्वयंचलित पीए सिस्टीमवर घोषणा केली आणि ब्लू लाइन ट्रेन, हळू-हळू रेडबर्ग प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे जाऊ लागली. सुश्रुत आता 28 किलोमीटर अंतराच्या एका दिवसात तीन रेल्वे फेऱ्या करते.  तिच्यावर सासरची मंडळी आणि एका लहान बाळाची जबाबदारी आहे. तेलंगणामधील महबूबनगरची असलेली सुश्रुत म्हणाली की, तीन महिने हैदराबाद मेट्रो रेल्वेद्वारे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने ट्रेन ऑपरेटर (Train Operator) म्हणून काम करणं सुरू केलं आहे. यासाठी आई-वडिलांनी मोठं पाठबळ दिलं आहे.

First published:

Tags: Gender stereotypes, International women's day, Lifestyle, Metro, Success, Women