• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • नसबंदीची शस्त्रक्रिया करूनही 8 महिन्यानंतर ती बनली पुन्हा आई; डॉक्टरांचं भलतंच उत्तर

नसबंदीची शस्त्रक्रिया करूनही 8 महिन्यानंतर ती बनली पुन्हा आई; डॉक्टरांचं भलतंच उत्तर

file photo

file photo

कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया (sterilization surgery) केल्यानंतर आठ महिन्यांनी एक महिला आई बनल्याची बाब समोर आलीय. शस्त्रक्रिया करणाऱ्या सिव्हिल सर्जनच्या चुकीमुळं असा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

 • Share this:
  चतरा, 07 ऑक्टोबर : लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाद्वारे देशभरात कुटुंब नियोजन अभियान राबवलं जात आहे. मात्र, या अभियानांतर्गत केली जात असलेली महिलांची आणि पुरुषांची नसबंदी अनेकदा अपयशी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाच एका प्रकरणात कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया (sterilization surgery) केल्यानंतर आठ महिन्यांनी एक महिला आई बनल्याची बाब समोर आलीय. शस्त्रक्रिया करणाऱ्या सिव्हिल सर्जनच्या चुकीमुळं असा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या ( sterilization surgery) 8 महिन्यांनंतर एक महिला आई बनल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ही डॉक्टरांची चूक असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना ही चूक कोणाकडून झाली, याचा शोध घेतला जात आहे, असं सिव्हिल सर्जन म्हणाले आहेत. झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील मयूरहंड प्रखंडातील तिलरा गावात ही घटना घडल्याचं वृत्त ‘प्रभात खबर’मध्ये प्रकाशित झालंय. हे वाचा - संतापजनक! जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण; महाराष्ट्राला हादरवणारी घटना इटखोरी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्राचे सर्जन भूषण राणा यांनी तिलरा गावातल्या राजू पासवान यांची पत्नी कंचन देवी यांची नसबंदी केली होती. या महिलेनं 27 सप्टेंबरला हजारीबाग येथील खासगी नर्सिंग होममध्ये बाळाला जन्म दिला. प्रभारी वैद्यकीय अधिकारी सुमीत जयस्वाल यांना याबाबत कळल्यावर त्यांनी त्या महिलेला भेटून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. हे वाचा - ITR filing : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता इन्कम टॅक्स रिटर्न भरा मोफत, वाचा प्रोसेस चतरा सिव्हिल सर्जन एस.एन.सिंह यांना या प्रकरणाची माहिती कळली असता, त्यांनी ही चूक कोणाची आहे, याची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं. दरम्यान नसबंदीनंतर मूल झाल्याच्या किंवा पुरुष आणि महिला अशा दोघांचीही नसबंदी अपयशी ठरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. याला अनेक कारणं असू शकतात. मात्र, यामुळं शासनाच्या लोकसंख्या नियंत्रण मोहिमेला फटका बसत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: