जाहिरात
मराठी बातम्या / देश / नवऱ्यानं मजुरी करुन बायकोला लावली नोकरी, पण जॉब मिळताच ती दुसऱ्यासोबत पळाली, नेमकं काय घडलं?

नवऱ्यानं मजुरी करुन बायकोला लावली नोकरी, पण जॉब मिळताच ती दुसऱ्यासोबत पळाली, नेमकं काय घडलं?

पती आणि पत्नी

पती आणि पत्नी

या दोघांचे लग्न 14 वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर ते दोघेही प्रेमाने राहत होते. पण पत्नीला नोकरी लागल्यावर धक्कादायक प्रकार घडला.

  • -MIN READ Jharkhand
  • Last Updated :

पवन कुमार राय, प्रतिनिधी साहेबगंज, 7 जुलै : उत्तरप्रदेश राज्यातील महिला पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या या सध्या सोशल माडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या पतीची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका महिलेला नोकरी मिळाल्यानंतर ती तिच्या बेरोजगार पतीला सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना झारखंड राज्यातील असून कल्पना असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हाई पंडित यांचा विवाह 14 वर्षांपूर्वी कल्पना देवीसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. अशिक्षित पतीने पत्नीला जमशेदपूरमध्ये ठेवले आणि तिला एएनएमचा अभ्यास करून दिला. अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कल्पनाला नोकरीही लागली, पण नोकरी मिळताच ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. पतीने केला हा आरोप - कल्पना या महिलेचा पती कन्हाई याने आरोप केला आहे की, पत्नीला शिकवण्यासाठी पैसे काढल्याने त्या कर्जामुळे तो पैसे कमाईसाठी गुजरातला गेला होता. मात्र, परत आल्यावर त्याला बायकोची वागणूक फारशी चांगली वाटली नाही. तिचे पतीसोबत भांडण झाले आणि नंतर ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. यानंतर पतीने पत्नीच्या शोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला, पण तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. गुरुवारी त्याला एसडीपीओ कार्यालयातून फोन आला की त्याने सर्व माहिती घेऊन कार्यालय गाठावे. कार्यालयात पोहोचल्यावर एसडीपीओने प्राथमिक चौकशी केली. यानंतर गावातील काही साक्षीदारांसह त्याला पुन्हा कार्यालयात येण्यास सांगितले. कन्हाई पंडित याने पत्नीने घरातून पळून गेल्याचा गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पीडितेचा पती कन्हाई पंडितने सांगितले की, त्याचे लग्न 14 वर्षांपूर्वी तेलो गावातील रहिवासी राजकिशोर पंडित यांची मुलगी कल्पना कुमारीसोबत झाले होते, त्यानंतर ते दोघेही प्रेमाने राहत होते. दोघांना हेमंतकुमार पंडित हा 10 वर्षांचा मुलगा आहे. कन्हाई पंडित यांनी सांगितले की, माझी पत्नी संध्याकाळपर्यंत परत येईल, असे सांगून 14 एप्रिल रोजी तिच्या माहेरी गेली. सायंकाळपर्यंत पत्नी न परतल्याने पती कन्हाई पंडित याने शोधाशोध सुरू केली आणि माझी पत्नी कल्पना अद्याप घरी आली नसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले. त्यानंतर खूप शोधाशोध केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. यानंतर कन्हाई पंडितने बोरीओ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन तपासाची मागणी केली. कन्हाई पंडितने आपल्या पत्नीवर आरोप करत सांगितले की, त्याच्या पत्नीचे कुण्या दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचे माहिती होत आहे. तसेच ती माझ्या मुलासह पळून गेली आहे. मी मजुरी काम करुन माझी पत्नी कल्पना हिला एएनएमचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर तिने माझी फसवणूक केली आणि ती कुणासोबत तरी पळून गेली. या प्रकरणाच्या संदर्भात साहिबगंजला पोहोचलेल्या कन्हाई पंडितने सांगितले की, त्याच्या जमिनी आणि मालमत्तेची सर्व कागदपत्रे पत्नीकडे आहेत. त्याची पत्नी त्याला ही कागदपत्रे त्याला देत नाही आहे. त्याची पत्नी म्हणते, तू मालमत्तेचे काय करणार. मला एक मुलगा आहे. नंतर पुत्राला सर्व संपत्ती मिळेल, म्हणून तू आम्हांला, सर्व संपत्ती व मुलाला विसरुन जा. या सर्व प्रकारानंतर मला न्याय मिळावा, अशी मागणी त्याने पोलिसांसमोर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: jharkhand , wife
  • First Published :
जाहिरात
जाहिरात