अमेठी, 9 जुलै : उत्तरप्रदेशातील महिला पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या प्रकरणानंतर अमेठीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने पत्नीला नर्स बनवले. यानंतर तिला नोकरी लागल्यावर तिने आपल्या पतीलाच सोडून दिले. याप्रकरणी पतीने आरोप केला आहे की, मिलिटरी स्कूलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर पत्नीचे एका शिक्षकासोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर पत्नीने त्याच्याशी सर्व संबंध तोडले. हे प्रकरण अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज पोलीस ठाणे भागात कार्यरत असलेल्या अमेठी सैनिक स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या महिला नर्सिंग स्टाफमधील सदस्याशी संबंधित आहे. पीडित पतीने पत्नीवर गंभीर आरोप केले असून त्याने याप्रकरणी तक्रार करण्यासाठी अमेठी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. त्याने सांगितले की, पोलीस अधीक्षक यांना भेटायला आलो आहे आणि मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सुशील कुमार असे या पतीचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील राकरी गावातील रहिवासी आहे. तो म्हणाला की, 2013 मध्ये त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्याने पत्नीला शिकवले आणि तिला नोकरीसाठी सक्षम केले. आज त्याची पत्नी सैनिक स्कूलमध्ये कार्यरत आहे. तीही शाळेतच बांधलेल्या निवासी संकुलात राहते. तो पुढे असे म्हणाला की, पण आता त्याची पत्नी त्याला आपल्या मुलीलाही भेटू देत नाही. मिलिटरी स्कूलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर पत्नीचे एका शिक्षकासोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर पत्नीने त्याच्याशी सर्व संबंध तोडले. असा आरोप त्याने केला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये जेव्हा तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी शाळेत पोहोचला होता, तेव्हा त्याच्या लक्षात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रारही केली होती. यानंतर दोघांमधील वाद इतका वाढला की हे प्रकरण मध्य प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयात पोहोचले. पत्नी त्याला मुलीला भेटू देत नाही. कॉलेज प्रशासनानेही त्याच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. सुशील कुमार याने दिलेल्या अर्जासोबत अनेक पुरावे देत पोलीस अधीक्षकांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. तर पीडित सुशीलची पत्नी प्रिया हिने लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत, शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्या पालकांनी तिला नोकरी लावल्याचे सांगितले. नवरा तिला विनाकारण त्रास देतो. पतीने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे, जो सध्या विचाराधीन आहे. मुलगी तिच्यासोबत राहते. तिला नाहक त्रास देण्यासाठी पती सतत तक्रारी आणि आरोप करत आहे, असा दावा तिने केला आहे.