नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र ऐनवेळी यात अडथळा आणत ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली. दोषी स्वत:चा बचाव करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार या चारही दोषींना वेगवेगळी शिक्षा होऊ शकते. आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या सामूहिक व बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला असेही सांगितले की निर्भय सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दोषी कायद्याचा आधार घेत शिक्षेची अंमलबजावणी करण्यास विलंब करीत आहेत. तर दुसरीकडे रेबेका जॉन म्हणाले की, दोषी मुकेशची याचिका मेरिटच्या आधारावर फेटाळण्यात आली आहे. दिल्लीच्या पातियाळा हाऊस कोर्टाकडून दोन वेळा डेथ वारंट जारी झाल्यानंतर फेटाळण्यात आली आहे. दोषींच्या वकिलांनी दोषींचे वकील कायद्यातील डावपेच खेळत असल्याने दोषींची फाशी पुढे ढकलली जात आहे. निर्भयाच्या दोषींना कायदेशीर मदत मिळत असल्याने किंवा ते पुरेपूर कायद्याचा उपायोग करीत असल्याने त्यांची फाशी पुढे ढकलली जात आहे. दोषींच्या वकिलांकडून त्यांचा बचाव करण्यासाठी कायदेशीर प्रत्येक पर्यायांचा अवलंब केला जात आहे
सर्वोच्च न्यायालयात निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दोषी पवन शर्माची याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. या याचिकेवर पवनकडून दावा करण्यात आला होता की, जेव्हा बलात्काराची घटना झाली होती तेव्हा पवन हा अल्पवयीन होता म्हणजेच त्याचे वय 18 पेक्षा कमी होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींपैकी अक्षय कुमार सिंह याची सुधारात्मक याचिका फेटाळली होती. न्यामूर्ती एनवी रमण, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आरएफ नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंड़पीठाने दोषी सिंह याची सुधारात्मक याचिका फेटाळली होती. सोबतच खंडपीठाने 1 फेब्रुवारी रोजी दिली जाणारी फाशीच्या शिक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेली याचिका फेटाळली होती.