मराठी बातम्या /बातम्या /देश /

Republic Day 2021 : प्रजासत्ताक दिनाला का वाजवतात Christian hymn?

Republic Day 2021 : प्रजासत्ताक दिनाला का वाजवतात Christian hymn?

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश (Largest Democratic Country in the world) आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का?या दिवशी मानवंदना कुणाला दिली जाते? या दिवशी कुठलं ख्रिश्चन गीत वाजवलं जातं? Republic Day बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश (Largest Democratic Country in the world) आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का?या दिवशी मानवंदना कुणाला दिली जाते? या दिवशी कुठलं ख्रिश्चन गीत वाजवलं जातं? Republic Day बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश (Largest Democratic Country in the world) आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का?या दिवशी मानवंदना कुणाला दिली जाते? या दिवशी कुठलं ख्रिश्चन गीत वाजवलं जातं? Republic Day बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

पुढे वाचा ...
  मुंबई, 25 जानेवारी : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश (Largest Democratic Country in the world) आहे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने लोकशाही मार्गानं देशाची वाटचाल करण्याचं निश्चित केलं. दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा होणारा भारतीय लोकशाहीचा उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन 2021 (Republic Day 2021 ) या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? प्रजासत्ताक दिनाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आता पाहू या प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? (Why do we celebrate republic day?) उत्तर :  भारतीय घटना समितीनं 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वतंत्र देशाच्या राज्यघटनेला (Constitution) मान्यता दिली. तर राज्यघटनेची प्रत्यक्ष अमंलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवसापासून सुरुवात झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021 )म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती? (Which is the lengthiest constitution in the world?) उत्तर :   भारतीय राज्यघटना (Indian Constitution ) ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. ही राज्यघटना तयार झाली तेंव्हा त्यामध्ये 395 कलम,  22 भाग आणि 8 परिशिष्ट होती. आता वेगवेगळ्या घटनादुरुस्तीनंतर राज्यघटनेमध्ये 448 कलम आणि 12 परिषिष्ट आहेत. लोकशाही देशातील सर्वात मोठी आणि विस्तृत अशी लेखी राज्यघटना भारताची आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणती तत्वं ही फ्रेंच राज्यघटनेतून घेतली आहेत? (which concepts din the indian constitution are inspired by the french constitution? उत्तर :  स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व ही भारतीय राज्यघटनेतील तत्व फ्रेंच राज्यघटनेतून घेतली आहेत. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कोण करतं? (Who unfurls the flag on Republic Day?) उत्तर :   स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) या दोन्ही राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मोठं महत्त्व आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वाजारोहण करतात. त्यानंतर ते देशाला उद्देशून भाषण करतात. तर, प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती (President Of India) हे ध्वाजारोहण करतात. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम हा स्वातंत्र्य दिनाप्रमाणे लाल किल्ल्यावर न होता राजपथावर होतो. प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात मानवंदना कोण स्वीकारतं? (Who takes the salute on republic day at Rajpath?) उत्तर: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात होणारी परेड हा संपूर्ण जगाचा आकर्षणाचा बिंदू असते. पण या परेडची मानवंदना पंतप्रधान नव्हे, तर राष्ट्रपती स्वीकारतात. या परेडमध्ये भारताच्या तिन्ही सैन्य दलातील जवान, नागरी सुरक्षा दल तसेच पोलीसांची तुकडी सहभागी होते. देशाच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या नात्यानं राष्ट्रपती या कार्यक्रमात सुरक्षा दलाच्या मानवंदनेचा स्वीकार करतात. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? (Who is the first president of India?) उत्तर:  थोर स्वातंत्र्य सैनिक आणि घटना समितीचे (Constituent Assembly) अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद (Dr. Rajendra Prasad) हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते 1950 ते 1962 या काळात भारताचे राष्ट्रपती होते. भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिले आहे? (Who composed the national anthem of India?) उत्तर:  जन, गण, मन हे भारताचे राष्ट्रगीत असून ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणतं ख्रिश्चन धार्मिक गीत वाजवलं जातं? (Christian hymns during republic parade) उत्तर – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी Abide with me हे ख्रिश्चन गीत वाजवलं जातं.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Republic Day

  पुढील बातम्या