नवी दिल्ली, 23 डिसेंबर : लॉकडाऊन विविध क्षेत्रातील लोकांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. अनेक राजकीय व्यक्तीही मदतीसाठी पुढे आले आहेत. लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप 10 खासदारांच्या यादीत राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे.
GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या 10 खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे. GovernEye या संस्थेने 1 ऑक्टोबरपासून यासंदर्भातील सर्वेक्षण सुरू केलं होतं. यातील 25 खासदारांपैकी 10 जणांचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. या यादीत राहूल गांधीं यांच्या नावाचा समावेश आहे.
मतदारसंघातील नागरिकांच्या मुलाखती व त्यांच्याकडील प्रतिक्रियानुसार सर्वाधित मदत केलेल्या 25 खासदारांची निवड करण्यात आली. त्यातूनच 10 जणांची विशेष नावं निवडण्यात आल्याचं संस्थेने सांगितले.
टॉप १० खासदार
अनिल फिरोजिया – भाजपा
अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी
राहुल गांधी-काँग्रेस
महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस
एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा
हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना
सुखबीर सिंग बाद-एसएडी
शंकर लालवानी -भाजपा
नितीन गडकरी-भाजपा
डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके
या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर अनिल फिरोजिया भाजपच्या खासदारांचं नाव आहे. राहुल गांधींबरोबरच नितीन गडकरी यांचेही सर्वाधिक मदत केलेल्या खासदारांच्या यादीत समावेश आहे. कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं होतं. यादरम्यान अनेकजण मदतीसाठी पुढे आले. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandh