चिदंबरम यांच्यावर कारवाई; अमित शहा म्हणाले होते, 'मैं समंदर हूं, लौटकर जरूर आऊंगा'

चिदंबरम यांच्यावर कारवाई; अमित शहा म्हणाले होते, 'मैं समंदर हूं, लौटकर जरूर आऊंगा'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक केल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक केल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. विशेषत: सोशल मीडियावर नेटिझन्स या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे चिदंबरम यांच्यावरील कारवाईचा संबंध केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी देखील जोडला जात आहे. काँग्रेसची सत्ता असताना सीबीआयने अमित शहा यांना अटक केली होती. तेव्हा अमित शहा यांना तुरुंगात रहावे लागले होते. इतक नव्हे तर गुजरातमध्ये जाण्यावर देखील बंदी घालण्यात आली होती. आता या घटना क्रमावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सीबीआय अथवा ईडी यांच्यावापर करून केल्या जाणाऱ्या खेळात एके काळी काँग्रेसने भाजपच्या दिग्गज नेत्यांना मात दिली होती. त्याच खेळात आज काँग्रेसचे नेते अडकले आहेत. केवळ 7 वर्षात संपूर्ण खेळच बदलला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या अमित शहांचा एक शेर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा शेर त्यांनी 2012मध्ये जेव्हा बंदीनंतर प्रथमच गुजरातमध्ये प्रवेश केला होता तेव्हा बोलला होता.

अमित शहांनी आजच्या दिवसासाठी वाचला होता तो शेर?

सोशल मीडियावर सध्या जी चर्चा सुरू आहे त्याचा अर्थ लावायचा असेल तर 9 वर्ष मागे जावे लागेल. देशात तेव्हा काँग्रेसची म्हणजे युपीए-2ची सत्ता होती. पी.चिदंबरम तेव्हा देशाचे गृहमंत्री होते. 2008मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर शिवराज पाटील यांना गृहमंत्रीपदावरून हटवून चिदंबरम यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेव्हाच सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणी सीबीआयने तेव्हा अमित शहा यांना आरोपी केले होते. 25 जुलै 2010 रोजी सीबीआयने त्यांना अटक देखील केली होती. या अटकेच्या आधी अमित शहा यांनी भाजपच्या कार्यालयात पत्राकार परिषद देखील घेतली होती. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात स्वत:ला निर्दोष असल्याचे तेव्हा सांगितले होते. राजकीय हेतूने करण्यात आलेला हा आरोप न्यायालयात टिकणार नाही असे ही ते म्हणाले होते. सीबीआयने त्यांना अटक करण्याआधी अमित शहा 4 दिवस बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांना 3 महिने तुरुंगात रहवे लागले होते. 29 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांना जामीन मिळाला आणि त्यानंतर गुजरात जाण्यावर बंदी घालण्यात आली.

दोन वर्षानंतर गुजरातमध्ये परतल्यावर शहा म्हणाले...

तब्बल 2 वर्ष गुजरातबाहेर राहिल्यानंतर 2012च्या विधानसभा निवडणुकीआधी ते राज्यात परतले. गुजरातमध्ये परतल्यानंतर एका मिटिंगमध्ये ते सहभागी झाले होते. या मिटिंगमध्ये त्यांनी एक शेर वाचला होता. अमित शहा म्हणाले...

मेरा पानी उतरता देख

किनारे पर घर मत बना लेना

मैं समंदर हूं

लौटकर जरूर आऊंगा

अमित शहा यांनी म्हटलेला तो शेर आजच्या परिस्थितीशी जोडला जात आहे. तेव्हा चिदंबरम देशाचे गृहमंत्री बोके आणि अमित शहा सीबीआयच्या जाळ्यात तर आज शहा हे गृहमंत्री आहेत आणि चिदंबरम सीबीआयच्या जाळ्यात आहेत. 9 वर्षात या परिस्थितीने यु-टर्न घेतला आहे.

नऊ वर्षापूर्वी भाजपने अमित शहा यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने असल्याचा आरोप केला होता. तसाच आरोप आज काँग्रेसचे नेते करत आहेत. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या प्रमाणेच चिदंबरम यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती आणि स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले होते.

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 04:17 PM IST

ताज्या बातम्या